मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
उष्ट्रासन *

उष्ट्रासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ४१)
उष्ट्र म्हणज उंट.

पध्दती
१. जमिनीवर गुडघे टेका, मांडया आणि पावले जुळलेली असू द्या, पायाची बोटे मागे रोखलेली आणि जमिनीवर टेकलेली असू द्या.
२. तळहात पुठठ्यावर टेका. मांडया ताणा, कण्याला पाठीमागे बाक द्या. आणि बरगड्या ताणा. (चित्र क्र. ४०)
३. श्वास सोडा. उजवा तळहात उजव्या टाचेवर व डावा तळहात डाव्या टाचेवर ठेवा. शक्य झाल्यास तळहात पायांच्या चवड्यावर ठेवा.
४. तळहात पावलावर घट्ट दाबा. डोके मागे झुकवा आणि पाठीचा कणा मांडयाकडे ढकला. मांडया जमिनीशी काटकोनामध्ये असाव्यात.
५. कुल्ले आकुंचित करा आणि कण्याच्या गुदास्थीचा व छातीमागचा भाग आणखी ताणा. मान पाठीमागे ताणलेली असू द्या. (चित्र क्र. ४१)
६. या स्थितीत नेहमीसारखे श्वसन करीत अर्धे मिनिट राहा.
७. आधी एक आणि नंतर एक अशा तर्‍हेने हात मोकळे करा आणि पुठ्ठ्यावर टेकवा. (चित्र क्र. ४०) मग जमिनीवर बसा आणि विसावा घ्या.

परिणाम
उतरते खांदे आणि पाठीला कुबड असलेल्या लोकांना हे आसन लाभदायक ठरते. पाठीचा संपूर्ण कणा मागच्या बाजूला ताणला जातो आणि सुदृढ बनतो. वृध्द माणसे आणि पाठीच्या कण्याला दुखापत झालेली माणसे सुध्दा हे आसन सुलभतेने करु शकतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP