मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पार्श्व शीर्षासन *

पार्श्व शीर्षासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २०२ आणि २०३)
पार्श्व म्हणजे कूस किंवा बाजू. शीर्षासनाच्या या प्रकारात तोल सांभाळताना डोके किंवा हात स्थिर ठेवून धड आणि पाय हे कुठल्यातरी बाजूला वळवले जातात.

पध्दती
१. सालंब शीर्षासन १ (चित्र क्र. १८४) करा. श्वास सोडा. आणि पाठीचा कणा उजव्या दिशेला वळवा. डोके आणि हात यांच्याखेरीज बाकीचे सर्व शरीर बाजूकडे वळवा. (पुढील दृश्य : चित्र क्र. २०२; मागील दृश्य : चित्र क्र. २०३)
२. चित्रात दाखविल्याप्रमाणे पाय आणि बेंबी मूळ स्थितीपासून ९० अंशांनी बाजूला वळलेली असावयास पाहिजे. खुब्याच्या आसपास (तरंगत्या बरगडया) यामुळे ताण जाणवला पाहिजे.
३. नेहमीसारखे श्वसन करीत या स्थितीत सुमारे २० ते ३० सेकंद राहा.
४. श्वास सोडा. सरळ सालंब शीर्षासन १ मध्ये पुन्हा या. एकदा श्वास घ्या. श्वास सोडा आणि हे आसन डाव्या बाजूकडे आधीइतका वेळ पुन्हा करा. श्वास सोडा. आणि सालंब शीर्षासन १ च्या सरळ स्थितीमध्ये या.

परिणाम
या आसनामुळे पाठीचा कणा सशक्त आणि लवचिक बनतो.

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP