एकपाद सेतुबंध सर्वांगासन किंवा एकपाद उत्तान मयूरासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २६०)
एकपाद म्हणजे एक पाय. एक पाय वर ठेवून करण्याचा हा, आधीच्या आसनाचा वेगळा प्रकार आहे.
पध्दती
१. सेतुबंध सर्वांगासना (चित्र क्र. २५९) मध्ये राहिल्यानंतर, श्वास सोडा आणि उजवा पाय उचलून काटकोनात उभा करा. (चित्र क्र. २६०) दोन्ही पायांना पूर्ण ताण द्या आणि या स्थितीत १० सेकंद राहा.
२. श्वास घ्या. उजवा पाय जमिनीवर आणा. श्वास सोडा. डावा पाय वर उचलून काटकोनात उभा करा आणि दोन्ही पायांन पूर्ण ताण द्या. आधीच्या इतकाच वेळ या स्थितीत राहा. श्वास घ्या आणि पाय जमिनीवर आणा.
३. श्वास सोडा. पायाना झोका देऊन पुन्हा सर्वांगासनात (चित्र क्र. २२३) न्या. पाठीवरुन हात काढून पाय हळूहळू जमिनीवर आणा. आणि जमिनीवर पडून विसावा घ्या
सेतुबंध सर्वांगासन आणि एकपाद सेतुबंध सर्वांगासन यांचे परिणाम.
या दोन आसनांमुळे पाठीच्या कण्याला मागच्या दिशेने ताण बसतो आणि सर्वांगासनाचे इतर प्रकार करताना मानेला पडलेला ताण नाहीसा होतो. निकोप आणि लवचिक असा पाठीचा कणा हा निकोप मज्जासंस्थेचा निदर्शक असतो. मज्जा निरोगी असली तर मनुष्याचे मन आणि शरीर ही दोन्ही निरोगी राहातात.
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2020
TOP