पर्वतासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. १०७)
पद्मासनाच्या या वेगळ्या प्रकारात बोटे एकमेकांमध्ये गुंफून हात डोक्याच्या वर उंचावले जातात.
पध्दती
१. पद्मासनामध्ये बसा. (चित्र क्र. १०४)
२. बोटे एकमेकांमध्ये गुंफा आणि हात डोक्यावर सरळ उभे करा. डोके पुढे वाकवून हनुवटी छातीच्या हाडावर टेकवा.
३. पाठीच्या कण्यानजीकच्या खुब्यांपासून आणि खांद्याच्या पात्यांपासून हात वरच्या दिशेला ताणा. तळहात वर वळलेले असू द्या. (चित्र क्र. १०७)
४. या स्थितीत दीर्घ आणि समतोल श्वसन करीत १ ते २ मिनिटे राहा. मांडी बदला, बोटे एकमेकांत गुंफा आणि पाठ ताठ ठेवून पुन्हा ही मुद्रा करा.
परिणाम
या आसनामुळे संधिवाताच्या वेदना नाहीशा होतात. तसेच खांद्यामधील ताठरपणा जातो. हालचाली विमुक्तपणे होण्यास मदत होते. छाती सुदृढ बनते, पोटाचे अवयव आत खेचले जातात आणि छाती पूर्णपणे फुगविली जाते.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2020
TOP