पिंडासनयुक्त सर्वांगासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २६९)
पिंड म्हणजे गर्भ. सर्वांगासनाचा हा प्रकार म्हणजे आधीच्या प्रकाराचा पुढला टप्पा आहे. या प्रकारात वाकविलेली मांडी डोक्यावर टेकेल अशा बेताने खाली आणली जाते. हे आसन गर्भाशयातील बालकाप्रमाणे दिसते म्हणून त्याला हे नाव दिले गेले आहे.
पध्दती
१. प्रथम ऊर्ध्वपद्मासनयुक्त सर्वांगासन (चित्र क्र. २६१) करा. श्वास सोडा आणि मांडी कंबरेपासून वाकवून डोक्याच्या दिशेला आणा.
२. पाय डोक्यावर टेका. (चित्र क्र. २६८). पाठीवरुन हात काढा. आणि दोन्ही हातांचा गुडघ्यांभोवती वेढा देऊन एका हाताने दुसरा हात पकडा. (चित्र क्र.अ २६९). गुडघे वेढताना पाय चांगले टेकावे यासाठी धड मानेच्या जवळ आणा.
३. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत २० ते ३० सेकंद राहा आणि पुन्हा ऊर्ध्वपद्मासनयुक्त सर्वांगासनात या.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP