मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
वीरभद्रासन २ *

वीरभद्रासन २ *

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


(चित्र क्र. १५)
पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र. १)
२. दीर्घ श्वास घ्या आणि उडी मारुन पावले दोन बाजूना चार ते साडेचार फूट अंतरावर ठेवा. हात खांद्याच्या रेषेत दोन बाजूंना लांब पसरा. तळहात जमिनीकडे वळवा. (चित्र क्र. ३)
३. उजवे पाऊल ९० अंशांनी उजवीकडे वळवा. डावे पाऊल जरासे उजवीकडे वळवा. डावा पाय ताठ आणि गुडघ्याशी घट्ट आवळलेला (कडक) असू द्या. डाव्या पायाच्या गुडघ्यामागील स्नायूंना ताण द्या.
४. श्वास सोडा आणि उजवा गुडघा अशा तर्‍हेने वाकवा की त्यामुळे उजवी मांडी जमिनीशी समांतर होईल आणि पायाची नडगी जमिनीशी काटकोनात राहील. त्यामुळे उजवी मांडी व उजवी पोटरी या एकमेकींशी काटकोन करतील. वाकवलेला गुडघा घोटयाच्या पुढे न जाता टाचेच्या रेषेत असावयास पाहिजे. (चित्र क्र. १५)
५. दोन व्यक्ती दोन बाजूंनी तुमचे हात जणू खेचीत आहेत अशा तर्‍हेने हातांना उजवीकडे व डावीकडे ताण द्या.
६. चेहरा उजवीकडे वळ्वा आणि उजव्या तळहातावर दृष्टी खिळवा. डाव्या पायाचे मागचे स्नायू पूर्णपणे ताणा. पायाची मागची बाजू, पाठीचा छातीमागचा भाग आणि पुठ्ठा ही एका रेषेत असली पाहिजेत.
७. या स्थितीत २० सेकंद ते अर्धे मिनिट दीर्घ श्वसन करीत राहा. श्वास घ्या व क्र. २ च्या स्थितीवर या.
८. डावे पाऊल ९० अंशांनी डावीकडे वळवा. उजवे पाऊल थोडेसे डावीकडे वळवा. डावा गुडघा वाकवा आणि क्र. ३ ते ६ या स्थिती उलटया म्हणजे डाव्या बाजूने करा.
९. श्वास घ्या आणि क्र. २ च्या स्थितीवर या. श्वास सोडा आणि उडी मारुन ताडासनात या. (चित्र क्र. १)

परिणाम
या आसनामुळे पायाच्या स्नायूंना सौष्ठव आणि सशक्तता लाभते. पोटर्‍या आणि मांडया यांच्या स्नायूंमध्ये येणारे पेटके कमी होतात. पाय आणि पाठीचे स्नायू यांमध्ये लवचिकपणा येतो. आणि पोटातील अवयवांना सुदृढता येते. उभ्याने करावयाच्या आसनांवर प्रभुत्व मिळवले म्हणजे अभ्यासकाची पुढे वाकावयाची आसने करण्याची पूर्वतयारी होते. नंतर ती आसने सुकरतेने आत्मसात करता येतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP