मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
कूर्मासन *

कूर्मासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३६३ आणि ३६४)
कूर्म म्हणजे कासव. या आसनाला विश्वाचा आधार जो विष्णू त्याच्या कूर्मावताराचे नाव दिले आहे. देवांना सदैव तरुण ठेवणार्‍या अमृतासारखी कित्येक रत्ने जगप्रलयामध्ये वाहून गेली होती. ती परत मिळवण्यासाठी देवांनी दानवांबरोबर मैत्री केली आणि दोघांनी मिळून क्षीरसागराचे मंथन करण्याचे ठरविले. विष्णूने कासवाचे रुप धारण केले आणि तो सागराच्या तळाशी गेला. त्याच्या पाठीवर मंदार पर्वत रवीसारखा उभा केला आणि या पर्वताभोवती वासुकी नाग दोरीसारखा गुंडाळला गेला. देव आणि दानव यांनी सापाची दोरी ओढून आणि पर्वताची रवी फिरवून सहकार्याने समुद्र घुसळून काढला. या घुसळेल्या समुद्रातून अमृत बाहेर पडले, त्याचप्रमाणे विष्णूची पत्नी आणि संपत्ती आणि सौंदर्य यांची देवता लक्ष्मी हिच्यासारखी इतरही रत्ने उपलब्ध झाली. हे आसन तीन टप्प्यांमध्ये दिले आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये डोके व इतर अवयव आपल्या पाठीखाली ओढून घेतलेल्या, झोपलेल्या कासवासारखे शरीर दिसते; त्यामुळे ह्या आसनाला सुप्त कूर्मासन असे म्हटले जाते. (चित्र क्र. ३६८)

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७), दोन गुडघ्यांमधील अंतर दीड फूट होईल इतके पाय फाका.
२. गुडघे वाकवा. पावले धडाकडे ओढून गुडघे वर उचला.
३. श्वास सोडा. धड पुढे वाकवा आणि हातांचे पंजे, आधी एक आणि नंतर एक असे, गुडघ्याखाली सरकवा. (चित्र क्र. ३६० व ३६१) हात गुडघ्यांच्या खाली सरकवा आणि दोन्ही बाजूंना सरळ पसरा. खांदे जमिनीवर टेका. तळहात जमिनीवर टेका. (चित्र क्र. ३६२) एकदा श्वास घ्या.
४. श्वास सोडा. धड आणखी ताणा. मानेला ताण द्या. आणि प्रथम कपाळ, नंतर हनुवटी व शेवटी छाती जमिनीजवळ आणा, नंतर पाय सरळ लांबवा. (चित्र क्र. ३६३ व ३६४). गुडघे आता बगलांच्या जवळ असतील आणि गुडघ्यांची मागची बाजू दंडाच्या मागच्या बाजूला बगलांच्या जवळ स्पर्श करील.
५. हळू हळू ताण इतका वाढवा की हनुवटी आणि छाती जमिनीवर टेकावी. पाय पूर्णपणे लांबवा आणि टाचा जमिनीवर दाबून धरा. हा पहिला टप्पा. या स्थितीमध्ये ३० ते ६० सेकंद राहा.
६. आता मनगटे अशा तर्‍हेने वळवा की तळहात उताणे होतील. पाय, धड आणि डोके पूर्वी होती तशीच ठेवून हात खांद्यांपासून मागे न्या आणि सरळ पसरा. त्यामुळे कोपरापासूनचे पुढले हात कंबरेच्या सांध्यापाशी येतील. (चित्र क्र. ३६५). या स्थितीमध्ये कोपरे न वाकवता ३० ते ६० सेकंद राहा. हा दुसरा टप्पा.
७. गुडघे वाकवा आणि वर न्या. उजवे पाऊल डाव्या पायावर किंवा डावे पाऊल उजव्या पायावर घोटयापाशी ठेवून, पायांची घडी करा. (चित्र क्र. ३६७)
९. श्वास सोडा. डोके पायांच्या मध्ये घुसवा. कपाळ जमिनीवर टेकून ठेवा. डोक्याची मागची बाजू पायांच्या घडीला घोटयांपाशी स्पर्श करील. या अखेरच्या टप्प्याला नाव आहे :

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP