पहिल्या परिच्छेदामध्ये सामान्य निर्णय सांगितला व या दुसर्या परिच्छेदामध्ये विशेष निर्णय सांगितला आहे. मीमांसा व धर्मशास्त्र जाणणारे बुद्धिमान आणि आलस्यरहित असे पुरुष प्राचीन ग्रंथ पाहून प्राप्त झालेली कार्ये करतात. त्यांच्याकरिता हा माझा उद्योग नाही. जे मंदमति, आळशी व अज्ञ असून धर्मासंबंधी निर्णय जाणण्याची इच्छा करतात त्यांच्याकरिता हा धर्मसिंधुसार नावाचा सुबोध ग्रंथ मी रचिला आहे. या ग्रंथाने भक्तवत्सल असा श्रीमान विठ्ठल संतुष्ट होवो. या ग्रंथामधील सर्व मूलवचने व त्यासंबंधाचा विचार कौस्तुभ, निर्णयसिंधु, माधव इत्यादि ग्रंथामध्ये पहावा. हा ग्रंथ शब्द व अर्थ यांनी सदोष असेल करिता सज्जनांनी शोध करून याचे प्रेमाने सेवन करावे, सुदामदेवाचे कोंड्याने युक्त असे पोहे श्रीकृष्णाने देखील प्रेमाने सेवन केले तसेच माझ्या ग्रंथाविषयी सज्जनांनी करावे.
रविवारी सूर्याची पूजा, उपवास, सूर्याचा मंत्राचा जप ही केली असता सर्व रोगांचा नाश होतो.
"र्हीं र्हीं सः सूर्याय" हा सूर्याचा षडक्षर मंत्र जाणावा.
इति श्रीमत्काश्युपाध्यायसूरिसूनुयज्ञेश्वरोपाध्यायानुजानन्तोपाध्यायसूरिसुतकाशीनाथोपाध्यायविरचिते धर्मसिन्धुसारे प्रकीर्णनिर्णयोद्देशः समाप्त ॥
याप्रमाणे दुसरा परिच्छेद समाप्त झाला.