लोखंडाची शनीची मूर्ति करून ती तेलाने भरलेल्या लोखंडाच्या अथवा मृत्तिकेच्या कुंभामध्ये ठेवावी. ती दोन काळ्या वस्त्रांनी अथवा कांबळ्याने वेष्टित करावी. काळी सुगंधयुक्त पुष्पे. तिलमिश्रित अन्न, तिळांची खिचदी इत्यादिकांनी त्या मूर्तीचे पूजन करावे. नंतर ती मूर्ति कृष्णवर्ण ब्राह्मणाला अथवा तसा न मिळेल तर इतर ब्राह्मणाला "शं नो देवी०" या मंत्राने दान करावी. दान करणारा शूद्र असेल तर
"यः पुनर्नष्टराज्याय नलाय परितोषितः ।
स्वप्ने ददौ निजं राज्यं स मे सौरिः प्रसीदतु ॥
नमोर्कपुत्राय शनैश्चराय नीहारवर्णाञ्जनमेचकाय ।
श्रुत्वा रहस्यं भव कामदस्त्वं फलप्रदो मे भव सुर्यपुत्र ॥"
इत्यादि मंत्रानी दान करावे. याप्रमाणे दर शनिवारी असे एक संवत्सरपर्यंत व्रत करावे. अथवा
"कोणस्थः पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोन्तको यमः ।
सौरिः शनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः ॥"
ही दहा नावे दररोज पठन करावी.
शनीचे स्तोत्र -
पिप्पलाद उवाच ।
नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमोस्तुते ।
नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते ॥
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च ।
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ॥
नमस्ते मन्द्संज्ञाय शनैश्चर नमोस्तु ते ।
प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च ॥
या स्तोत्राने दररोज प्रातःकाळ शनीचे स्तवन केले असता साडेसात वर्षाच्या शनीच्या पीडेचा (साडेसातीचा) नाश होतो.