ही दुसर्या दिवसाची घ्यावी. या पुनवेला जे कर्म करावयाचे ते येणेप्रमाणे - सर्वांना धान्याचे दान द्यावे. ब्राह्मणदंपत्याला जेवण घालून, वस्त्रे, भूषणे वगैरेंनी सुशोभित करावे. कृष्णाजिन, तांबड्यारंगाची वस्त्रे, रुदार अंगरखे, जोडा व पांघरूण या वस्तु 'माधवाचा सन्तोष होवो' असे म्हणून द्याव्या.
'कृतस्य माघस्नानस्य साङ्गतार्थमुद्यापनं करिष्ये'
असा संकल्प करावा, किंवा
'सवित्रे प्रसवित्रेच परंधाम जलेमम ।
त्वत्तेजसा परिभ्रष्टं पापं यातु सहस्त्रधा ॥
दिवाकर जगन्नाथ प्रभाकर नमोस्तुते ।
परिपूर्ण करिष्येऽहं माघस्नानं तवाज्ञया ॥'
असाही संकल्प चतुर्दशीला करून उपास, अधिवासन व माधवपूजन केल्यावर पौर्णिमेला, तिल, चरु व घृत यांचा १०८ होम करावा आणि तिलशर्करायुक्त तीस मोदकांचे जेवण द्यावे, त्याचा मंत्र-
'सवितः प्रसवस्त्वं हि परंधाम जले मम ।
त्वत्तेजसा परिभ्रष्टं पापं यातु सहस्त्रधा ॥
दिवाकर जगन्नाथ प्रभाकर नमोस्तुते ।
परिपूर्णं कुरुष्वेऽहं माघस्नानमुषःपते ॥
त्यानंतर दंपत्याला पातळ वस्त्रे आणि सात प्रकारची धान्ये देऊन, ब्राह्मण व दंपत्य यांना षड्रसभोजन घालावे. त्याचा मंत्र -
'सूर्यो में प्रीयतां देवो विष्णुमूर्तिर्निरंजनाः
याप्रमाणे माघस्नान करणारा, संन्यासी, योगी आणि लढाईत शत्रूशी लढत असता मेलेला हे सूर्यमंडळाचा भेद करून जातात.