या तिथीला लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करण्यास सांगितले आहे.
'लक्ष्मीर्या लोकपालानां । धेनुरूपेण संस्थिता । घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ॥ अग्रतः सन्तु मे गावो गावो मे सन्तु पृष्ठतः ॥ गावो मे ह्रदये सन्तु गवांमध्ये वसाम्यहम् ॥'
या मंत्राने सवत्स गाईचे व बैलाचे पूजन करून त्यांना (मालादिकांनी) विभूषित करावे. या दिवशी गाईचे दूध काढू नये व बैलांकडून ओझ्यांची वगैरे कामे करून घेऊ नयेत.