प्रातःकाली स्नानसंध्या वगैरे नित्यकृत्य केल्यावर देशकालादिकांचा उच्चार करून, त्या काली सप्तमी इत्यादि तिथि असली तरी प्रधानभूत अष्टमीचाच उच्चार करून,
'श्रीकृष्णप्रीत्यर्थ जन्माष्टमीव्रतं करिष्ये'
असा संकल्प करावा. जयन्ती योग असेल तर ' जन्माष्टमीव्रतं जयन्ती. व्रतं च तन्त्रेण करिष्ये' असा संकल्प करावा. तांब्याच्या पात्रामध्ये उदक घेऊन
'वासुदेव संमुद्दिश्य सर्वपापप्रशान्तये ।
उपवासं करिष्यामि कृष्णाष्टम्यां नभस्यहम् ॥
आजन्ममरणं यावद्यन्मयादुष्कृतं कृतम् ।
तत्प्रणाशय गोविन्द प्रसीद पुरुषोत्तम ॥''
असे म्हणून प्रात्रातील उदक भूमीवर सोडावे. उपवास करण्याविषयी अशक्त असेल तर 'उपवासं करिष्यामि' याऐवजी 'फलानि भक्षयिष्यामि' असे म्हणावे. नंतर सुवर्ण अथवा रजत यांच्या, अथवा मृत्तिकेच्या अगर भिंतीवर काढलेल्या, जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे प्रतिमा कराव्या. त्या अशा-मंचकावर शयन केलेली देवकीची प्रतिमा करून तिचे स्तनपान करीत असलेली श्रीकृष्णाची प्रतिमा करावी. जयन्तीयोग असेल तर देवकीची आणखी एक मूर्ति करून तिच्या मांडीवर बसलेली श्रीकृष्णाची ही दुसरी मूर्ति करावी. मंचकावर शयन केलेल्या देवकीचे चरण चुरीत असलेली लक्ष्मीची मूर्ति करावी. भिंतीवर खङ्गधारी वसुदेव, नन्द, गोपी, गोप यांची चित्रे काढावी. दुसर्या ठिकाणि मंचकावर प्रसूत कन्येसह यशोदेची मूर्ति करावी. दुसर्या आसनावर वसुदेव, देवकी, नन्द, यशोदा, श्रीकृष्ण, राम (बळीराम), चण्डिका अशा सात प्रतिमा स्थापन कराव्या. इतक्या प्रतिमा करण्याविषयी असमर्थ असेल त्याने वसुदेवापासून चण्डिकेपर्यंत सात अथवा जसा आचार अथवा सामर्थ्य असेल त्याप्रमाणे कराव्या. आणि इतर मूर्तीचा जसा प्रचार सांगितला त्याप्रमाणे ध्यान करावे असे मला वाटते. मध्यरात्रीच्या जवळच्या पूर्वकाली स्नान करून
'श्रीकृष्णप्रीत्यर्थ सपरिवारश्रीकृष्ण्पूजा करिष्ये'
असा संकल्प करावा. नंतर न्यास, शंखादिकांची पूजा वगैरे नित्याप्रमाणे करून
"पर्यकस्थां किन्नराद्यैर्युतां ध्यायेत्तु देवकीम् ।
श्रीकृष्णं बालकं ध्यायेत्पर्यंके स्तन पायिनम् ॥
श्रीवत्सवक्षसंशान्तं नीलोत्पलदलच्छविम् ।
संवाहयन्ती देवक्याः पादौ ध्यायेच्च तां श्रियम् ॥"
याप्रमाणे ध्यान करावे. 'देवक्यै नमः या मंत्राने देवकीचे आवाहन करून मूलमंत्राने अथवा पुरुषसूक्ताच्या ऋचेने
'श्रीकृष्णायनमः श्रीकृष्णमावाहयामि'
याप्रमाणे आवाहन करून लक्ष्मीचे आवाहन करून
'देवक्यै वसुदेवाय यशोदायै नन्दाय कृष्णाय रामाय चण्डिकायै'
याप्रमाणे नाममंत्रानी आवाहन करावे. नंतर
'सकलपरिवारदेवताभ्यो नमः'
याप्रमाणे लिखित देवतांचे आवाहन करावे. मूलमंत्राने अथवा पुरुषसुक्ताच्या ऋचेने
'आवाहितदेवक्यादिपरिवारदेवतासहित श्रीकृष्णाय नमः'
असा उच्चार करून आसन, पाद्य, अर्घ्य, आचमनीय, अभ्यंगस्नान ही अर्पण करून पंचामृतस्नान झाल्यावर चंदनाचा अनुलेप करावा. नंतर शुद्धोदकाचा अभिषेक झाल्यावर वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप इत्यादि उपचार
'विश्वेश्वराय विश्वाय तथा विश्वोद्भवाय च ।
विश्वस्य पतये तुभ्यं गोविन्दाय नमो नमः ॥
यज्ञेश्वराय देवाय तथा यज्ञोद्भवायच ।
यज्ञानां पतये नाथ गोविन्दाय नमो नमः ॥"
हे दोन मंत्र मूलमंत्रासहित उच्चारुन अर्पण करावे.
"जगन्नाथ नमस्तुभ्यं संसारभयनाशन ।
जगदीश्वराय देवाय भूतानां पतये नमः ॥
या मंत्राने नैवेद्य अर्पण करावा. मूलमंत्रादिकाची योजना सर्वत्र करावी. तांबूल इत्यादिकांपासून नमस्कार, प्रदक्षिणा, पुष्पांजलीपर्यंत कर्म करावे. अथवा उद्यापनप्रकरणात सांगितलेल्या विधीने पूजा करावी. ती याप्रमाणे- वर सांगितलेल्या प्रकाराने ध्यान व आवाहन करावे.
"देवा ब्रह्मादयो येन स्वरूपं न विदुस्तव ॥ अतस्त्वां पूजयिष्यामि मातुरुत्सङ्गवासुनम् ॥ पुरुष एवेदमासनम् ॥ अवतारसहस्त्राणि करोषि मधुसूदन । न ते संख्यावतारानां कश्चिज्जानाति तत्त्वतः ॥ एवातानस्येतिपाद्यम् ॥ जातःकंसवधार्थाय मूभारोत्तारणायच । देवानां च हितार्थाय धर्मसंस्थापनाय च । कौरवाणां विनाशाय पाण्डवानां हिताय च । गृहाणार्घ्यं मया दत्तं देवक्या सहितो हरे ॥ त्रिपादू० अर्घ्यम ॥ सुरसुरनरेशाय क्षीराब्धिशयनाय च । कृष्णाय वासुदेवाय ददाम्याचमनं शुभम ॥ तस्मा० आचमनीयम् ॥ नारायण नमस्तेस्तु नरकार्णवतारक । गङ्गोदकं समानीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् । यत्पुरुषे० स्नानम् ॥ पयोदधि घृतक्षौद्रशर्करास्नानमुत्तमम् । तृप्त्यर्थं देवदेवेश गृह्यतां देवकीसुत ॥ इति पचामृतम् शुद्धोदकशानमाचमनम् ॥ क्षौमंच पट्टसूत्राढ्यं मयानीतांशुकं शुभम् । गृह्यतां देवदेवेश मया दत्तं सुरोत्तम ॥ तं यज्ञं० वस्त्रम् ॥ नमःकृष्णाय देवाय शंखचक्रधराय च ॥ ब्रह्मसूत्रं जगन्नाथ गृहाण परमेश्वर" तस्माद्यज्ञ० यज्ञोपवीतम् ॥ नानागन्धसमायुक्तं चन्दनं चारुचर्चितम् । कुंकुमाक्ताक्षतैर्युक्तं गृह्यतां परमेश्वर ॥ तस्माद्यज्ञा० गन्धम् । पुष्पाणि यानि दिव्यानि पारिजातोद्भवानि च । मालतीकेसरादीनि पूजार्थं प्रतिगृह्यताम् ॥ तस्माद० पुष्पाणि ॥ अथाङ्गपूजा ॥ श्रीकृष्णाय नमः पादौ पूजयामि । संकर्षणाय नमः गुल्फौ० । कालात्मने० जानुनी० । विश्वकर्मणे० नाभि० । विश्वनेत्राय० कटी० । विश्वकर्त्रे० मेढूं० । पद्मनाभाय० नाभिं । परमात्मने० ह्रदयं० । श्रीकृष्णाय० कण्ठं० । सर्वास्त्रधारिणे० बाहू० । वाचस्पतये० मुखं० । केशवाय० ललाटं० । सर्वात्मने० शिरः० ॥ विश्वरूपिणे नारायणाय० सर्वांगं० वनस्पतिरसो० ॥ यत्पुरुषं० धूपं० ॥ त्वं ज्योतिःसर्वदेवानां तेजस्त्वं तेजसा परम् । आत्मज्योतिर्नमस्तुभ्यं दीपोयं प्रतिगृह्यताम् ॥ ब्राह्मणो० दीपं० ॥ नानागन्धसमायुक्तं भक्ष्यभोज्यं च तुर्विधम् ॥ नैवेद्यार्थं मया दत्तं गृहाण परमेश्वर ॥ चंद्रमा मनसो० नैवेद्यं ॥ आचमनं करोद्वर्तनं० ॥ तांबूलंच सकर्पूरं पूगीफलसमन्वितम् ॥ मुखवासकरं रम्यं प्रीतिदं प्रतिगृह्यताम् ॥ सौवर्णं राजतं ताम्र नानारत्नसमन्वितम् । कर्मसाग्गुण्यसिद्ध्यर्थं दक्षिणा प्रतिगृह्यताम् ॥ रम्भाफलं नारिकेलं तथैवाम्रफलानि च ॥ पूजितोसि सुरश्रेष्ठ गृह्यतां कंससूदन ॥ नाभ्याआ० नीराजनं० ॥ यानि कानि० ॥ सप्तास्या० प्रदक्षिणाम् ॥ यज्ञेनेत्यादिवेदमन्त्रैःपुष्पांजलि नमस्कारान् ॥" 'अपराधस०'
याप्रमाणे प्रार्थना करून पूजा समाप्त करावी. अशी सर्वोपचारांनी युक्त पूजा समाप्त झाल्यावर बारा अंगुळे विस्तृत असा रुप्याचा अथवा भूमि इत्यादिकांवर लिखित असा रोहिणीसहित चंद्र करून त्याचे
"सोमेश्वराय सोमाय तथा सोमोद्वभवाय च ।
सोमस्य पतये नित्यं तुभ्यं सोमाय वै नमः ॥'
या मंत्राने पूजन करावे. नंतर पुष्प, दर्भ, चंदन यांसह शंखाने उदक घेऊन
"क्षीरोदार्णवसंभूत अत्रिगोत्रसमुद्भव ।
गृहाणार्घ्यं शशाङ्केश रोहिणीसहितो मम ॥
ज्यात्स्नापते नमस्तुभ्यं ज्योतिषां पतये नमः ।
नमस्ते रोहिणिकान्त अर्घ्यं नः प्रतिगृह्यताम् ॥"
या दोन मंत्रांनी चंद्राला अर्घ्य द्यावे. नंतर श्रीकृष्णाला अर्घ्य द्यावे. त्याचा मंत्र
"जातः कंसवधार्थाय भूभारोत्तारणाय च ।
पाण्डवानां हितार्थाय धर्मसंस्थापनाय च ॥
कौरवाणां विनाशाय दैत्यानां निघनायच ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं देवक्या सहितो हरे ॥"
याप्रमाणे अर्घ्य दिल्यानंतर
'त्राहि मां सर्व लोकेश हरे संसारसागरात् ।
त्राहि मां सर्वपापघ्न दुःखशोकार्णवत्प्रभो ॥
सर्वलोकेश्वर त्राहि पतितं मां भवार्णवे ।
त्राहि मां सर्वदुःखघ्न रोगशोकार्णवाद्धरे ॥
दुर्गतांस्त्रायसे विष्णो ये स्मरन्ति सकृत्सकृत ।
त्राहि मां देवदेवेश त्वतो नान्योस्ति रक्षिता ॥
यद्वा कचन कौमारे यौवने यच्च वार्धके ।
तत्पुण्यं वृद्धिमायातु पापं दह हलायुध ॥"
या मंत्रांनी प्रार्थना करावी.