फाल्गुन वद्य द्वितीयेला देश, गावे वगैरेच्या अधिपतींनी छत लावून सुशोभित केलेल्या आणि विस्तृत अशा जागेमधल्या रम्य आसनावर बसून-देशातल्या व गावातल्या लोकांवर शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून त्यांना विडे द्यावेत, आणि नृत्यगेतविनोदादिकांनी महोत्सव करावा. हा उत्सव सध्य वद्य (रंग) पंचमीपर्यंत लोक करतात.
फाल्गुनी अमावास्या - ही मन्वादि आहे. ही अपराह्णव्यापिनी घ्यावी. याप्रमाणे श्रीमदनन्तोपाध्यायांचे पुत्र जे काशीनाथोपाध्याय त्यांनी धर्मसिंधुसारात सांगितलेल्या फाल्गुनमासातल्या कृत्यांचा निर्णयोद्देश येथे संपला.