या महिन्यात तिलपात्रदान अत्युत्तम होय. सोळा पले चौर्यायशी तोळे) वजनाच्या तांब्याच्या भांड्यात प्रस्थपरिमित (सुमारे १७१ तोळे, सपाट) तीळ घालून त्यात एक कर्ष (१६ मासे) अथवा यथाशक्ति सोने घालून दान करण्यासाठी ठेवावे. नंतर '
वाङ्मनःकायज त्रिविधपापनाशपूर्वकं ब्रह्मलोकप्राप्तिकामस्तिलपात्रदानं करिष्ये'
असा संकल्प करावा. आणि ब्राह्मणाची पूजा केल्यावर
'देव देवजगन्नाथ वांच्छितार्थफलप्रद । तिलपात्रं प्रदास्यामि तवाङ्गे संस्थितोह्यहम् ॥'
या मंत्राने (तिलपात्र) दान करावे. धान्याचे माप - चार मुठींचा एक कुडव, चार कुडवांचा एक प्रस्थ. चार प्रस्थांचा एक आढक. आठ आढकांचा एक द्रोण. दोन द्रोणांचा एक शूर्प. दीड शूर्प म्हणजे एक खारी किंवा चार सुवर्णाचे एक पल. चार पलांचा एक कुडव. चार कुडवांचा एक प्रस्थ. चार प्रस्थांचा एक आढक. चार आढकांचा एक द्रोण. चार द्रोणांची एक खारी. असे हे प्रस्थाचे प्रमाण आहे. (ही सर्व मापे सध्या व्यवहारातून नाहीशी झाली असल्यानेच वर मासे वगैरे चालू मापे आम्ही वर कंसात दिली आहेत.) वर सांगितलेला प्रयोग करण्याचे ऐवजी सोने न घातलेले तिलपात्र,
'तिलाःपुण्याः पवित्राश्च सर्व पापहराः स्मृताः । शुक्लाश्चैव तथा कृष्णा विष्णुगात्रसमुद्भवाः ॥
यानि कानिच पापानि ब्रह्महत्यासमानिच ।
तिलपात्रप्रदानेन तानिनश्यन्तु मे सदा ॥
इदंतिलपात्रं यथाशक्ति दक्षिणासहित यमदैवतं ब्रह्मलोकप्राप्तिकामस्तुभ्यमहं संप्रददे'
असा उच्चार करून, दान करावे. सोन्याच्या तुलसीपत्रदानाचा मंत्र-
सुवर्णतुलसीदानाद्ब्रह्मणः कार्यसम्भवात् ।
पापं प्रशममायातु सर्वेसन्तु मनोरथाः ॥'
शालग्रामदानमंत्रः-शालग्रामशिला पुण्या भुक्तिमुक्तिप्रदायिनी ।
शालग्रामप्रदानेन ममसन्तु मनोरथाः ॥
चक्राङ्कितसमायुक्ता शालग्रामशिलाशुभा ।
दानेनैव भवेत्तस्या उभयोर्वाच्छितं फलम् ॥