१. दुसर्या दिवशीच निशीथकालव्यापिनी अष्टमी आणि दुसर्या दिवशीच निशीथकालाहून इतर काली रोहिणीयुक्त अष्टमी असा एक पक्ष. उदाहरण- सप्तमी ४७, अष्टमी ५० व अष्टमीच्या दिवशी कृत्तिका ४६. या ठिकाणि दुसर्या दिवसाची अष्टमी घ्यावी. याच्या समान युक्तीने पूर्व दिवशीच निशीथाकालव्यापिनी अष्टमी आणि पूर्व दिवशीच निशीथकालाहून इतर काली रोहिणीयुक्त अष्टमी असा पक्ष असेल तेव्हा पूर्व दिवसाची घ्यावी.
२. दोन्ही दिवशी निशीथकालाहून इतर काली रोहिणीयुक्त अष्टमी आणि दुसर्या दिवशीच निशीथकालव्यापिनी असा दुसरा पक्ष. उदाहरण - सप्तमी ४८ व कृत्तिका ३०; अष्टमी ४८ व रोहिणी २५. या ठिकाणीही दुसर्या दिवसाचि घ्यावी.
३. दोन्ही दिवशी निशीथकालाहून इतर काली रोहिणीयुक्त अष्टमी आणि पूर्वदिवशीच निशीथकालव्यापिनी असा तिसरा पक्ष. उदाहरण- सप्तमी २५ व कृत्तिका ४८, अष्टमी २० व रोहिणी ४३. या ठिकाणीही दुसर्या दिवसाची घ्यावी. दोन्ही दिवशी सारखा रोहिणीयोग असेल तरी पूर्व दिवशी सप्तमीने विद्ध आहे याकरिता पूर्व दिवसाची घ्यावी. उदाहरण- अष्टमी, ६०।४, कृत्तिका ५०. या ठिकाणी दोन अहोरात्रामध्ये रोहिणीयोग सारखा आहे तरी पूर्व दिवसाची शुद्ध असून पुर्णव्याप्ति आहे; याकरिता पूर्व दिवसाची घ्यावी.
४. दोन्ही दिवशी निशीथकालव्यापिनी अष्टमी व दुसर्या दिवशी निशीथकालाहून इतर काली रोहिणीयुक्त अष्टमी असा चवथा पक्ष. उदाहरण - सप्तमी ४३, अष्टमी ४१, कृत्तिका ४६. या ठिकाणी दुसर्या दिवसचीच घ्यावी. वरील प्रमाणे दोन्ही दिवशी निशीथकालव्यापिनी अष्टमी आणि पूर्व दिवशीच निशीथकालाहून इतर काली रोहिणियुक्त अष्टमी असा पाचवा पक्ष. उदाहरण सप्तमी ४१ व रोहिणी ४३; अष्टमी ४७. या ठिकाणीही पूर्व दिवसाचीच उपवासाला घ्यावी.
६. दोन्ही दिवशी निशीथकालव्यापिनी अष्टमी आणि दोन्ही दिवशी निशीथकालाहून इतर काली रोहिणीयुक्त अष्टमी असा सहावा पक्ष. उदाहरण- सप्तमी ४२ व कृत्तिका ४८; अष्टमी ४९ व रोहिणी ४२. या ठिकाणिही दुसर्या दिवसाची घ्यावी.
७. दोन्ही दिवशी निशीथकालव्याप्ति नाही आणि पूर्व दिवशीच निशीथकालाहून इतर काली रोहिणीयुक्त अष्टमी असा सातवा पक्ष. उदाहरण - सप्तमी ४८ व रोहिणी ५८; अष्टमी ४२. या ठिकाणिही दुसर्या दिवसाची घ्यावी. याच पक्षी व
१. दुसर्या दिवशीच (सप्तमी ४८; अष्टमी ४२ व कृत्तिका १२ अथवा
२. दोन्ही दिवशी (सप्तमी ४८ व कृत्तिका ४८; अष्टमी ४२ व रोहिणी ४२) निशीथकालाहून इतर काली अष्टमी रोहिणीयोग असेल तथापि दुसर्या दिवसाचीच घ्यावी असे कैमुतिक न्यायाने सिद्ध होते.
८. पूर्व दिवशीच निशीथकालव्यापिनी अष्टमी आणि दुसर्या दिवशीच निशीथकालाहून इतर काली रोहिणीयुक्त अष्टमी असा शेवटचा पक्ष. उदाहरण-
१. सप्तमी ३०; अष्टमी २५ व कृत्तिका ५. अथवा
२. अष्टमी ६०।४ व अष्टमीच्या शेषदिवशी कृत्तिका १. या दोन्ही ठिकाणी दुसर्या दिवसाची घ्यावी. रोहिणीयोग अल्प असेल तथापि तो प्रशस्त आहे. याकरिता दुसर्या दिवशी दोन घटिका जरी योग असेल तरी तीच ग्राह्य असल्यामुळे पूर्व दिवशी असलेल्या निशीथकालव्याप्तीचा आदर नाही. करिता या दोन्ही उदाहरणांमध्ये दुसर्या दिवसाचीच अष्टमि घ्यावी. वर सांगितलेल्या सर्व पक्षांचे ठिकाणी दुसर्या दिवशी जर दोन घटिकांहून कमी अष्टमी असेल तर ती घेऊ नये, पूर्वदिवसाचीच घ्यावी असे पुरुषार्थचिंतामणीमध्ये सांगितले आहे. दुसर्या दिवश्च निशीथकालव्यापिनी अष्टमी आणि पूर्व दिवशीच निशीथकालाहून इतर काली रोहिणीयुक्त अष्टमींचे उदाहरण -सप्तमी ४८ व रोहिणी ५५; अष्टमी ४८. या ठिकाणी विद्धा अष्टमीला निशीथकालानंतर रोहिणीयोग आहे व तो निरुपयोगी आहे, करिता दुसर्या दिवसाचीच घ्यावी. या ठिकाणी विस्ताराने जे बहुत पक्ष सांगितले त्यांच्या निर्णयाचा पुरुषार्थचिंतामणीमध्ये संक्षेपाने संग्रह आहे. शुद्धसमा, शुद्धन्यूना, विद्धसमा, विद्धन्यूना अथवा केवल अष्टमी यांचे विषयी संदेहच नाही. केवल अष्टमी शुद्धाधिका असेल तथापि पूर्वदिवसाची घ्यावी. पूर्वदिवशी निशीथकालव्याप्ति असून विद्धाध्का असेल तर पूर्वदिवसाचीच घ्यावी. दोन दिवस निशीथ कालव्याप्ति असेल अथवा नसेल तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी.