चंद्रसंक्रांतीच्या आधीची व नंतरची एक घटिका तेरा पळे पुण्यकाळ, मंगळसंक्रांतीच्या चार घटका एक पळ. बुधसंक्रांतीच्या तीन घटका चौदा पळे. गुरुसंक्रांतीच्या चार घटका सदतीस पळे. शुक्रसंक्रांतीच्या चार घटका एक पळ, शनिसंक्रांतीच्या सोळा घटका सात पळे. ही सर्व घटका व पळे, संक्रमणाच्या पूर्वीची व नंतरची समजावीत. सूर्यावाचून इतर ग्रहांचे संक्रमण जर रात्री होईल, तर त्याचा पुण्यकाळ रात्रीच समजावा; कारण सूर्यसंक्रांतीप्रमाणे त्याचा पुण्यकाळ दिवसासच असल्याचे वचन कोठेच नाही. चंद्रादि ग्रहांच्या संक्रमणकाळी स्नान करणे हे काम्य आहे, आवश्यक नाही.