त्रयोदशीला एकभुक्त राहून चतुर्दशीला नित्य कर्म केल्यावर सकाळी मंत्राने जो संकल्प करावा तो असा-
शिवरात्रिव्रत्म ह्येतत्करिष्येहं महाफलम् ।
निर्विघ्नमस्तुमेवात्र त्वत्प्रसादाजगत्पते ॥
चतुर्दश्यां निराहारो भूत्वा शंभो परेऽहनि ।
भोक्ष्येहं भुक्तिमुक्त्यर्थं शरणं मे भवेश्वर ॥
जो ब्राह्मण असेल त्याने रात्री प्रपद्ये जननी०' या दोन ऋचा म्हणूनसुद्धा उदक सोडावे. नंतर सायाह्नकाळी काळ्या तिळांनी स्नान करून, भस्माचा त्रिपुण्ड्र लावावा आणि रुद्राक्ष धारण करावे. रात्रीच्या सुरवातीला शिवालयात जाऊन पाय धुतल्यावर आचमन करावे. नंतर उत्तराभिमुख होऊन देशकालादिकांचा उच्चार केल्यावर पूजा जर दर प्रहराला करायची असेल, तर
'शिवरात्र प्रथमयामपूजां करिष्ये'
असा किंवा एकदाच पूजा करणे असेल तर
'श्रीशिवप्रीत्यर्थं शिवरात्रौ शिवपूजां करिष्ये'
असा संकल्प करावा. आता आधी सामान्य पूजेचा विधि सांगून, नंतर निरनिराळ्या प्रहरांच्या पूजांचा विशेष सांगेन. सामान्यपूजा विधिः -
'अस्य श्री शिवपंचाक्षरमन्त्रस्य. ॐमं अस्त्राय फट्...'
इ० न्यास करून कलशाची पूजा करावी व नंतर
'ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तप्रसन्नम् ॥
पद्मासनिं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिंवसानं विश्वाद्यं विश्वन्द्यं निखिल भयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं ॥'
असे ध्यान केल्यावर प्राण प्रतिष्ठा करावी. त्यानंतर (शिव) लिंगाला स्पर्श करून,
'ॐ भूःपुरुषं सांबसदाशिवमावाहवामि ॐ भुवः पुरुषं साम्ब० ॐ स्वः पुरुषं साम्ब० ॐ भुर्भुवः स्वः पुरुषं साम्ब०'
या मंत्रांनी आवाहन करावे.
'स्वामिन्सर्वजगन्नाथ यावत्पूजावसानकम् ।
तावत्त्वं प्रतिभावेन लिङ्गेस्मिन्सन्निधौभव'
या मंत्राने पुष्पांजलि द्यावा. स्थावर व चर लिंगांचा प्राणप्रतिष्ठेपासून आवाहनापर्यंतचा विधि करू नये.
'ॐ सद्योजातं प्रपद्यामि सद्योजातायवै नमोनमः ।
ॐ नमःशिवाय श्रीसाम्बसदाशिवायनमः आसनं समर्पयामि।'
या मंत्रांनी पूजा करावी. स्त्रिया व शूद्र यांनी 'ॐ नमः शिवाय' या पञ्चाक्षरी मन्त्राऐवजी 'श्रीशिवायनमः या मंत्राने पूजा करावी.
ॐ भवेभवे नातिभवे भवस्व मां ॐ नमः शिवाय श्रीसाम्बसदाशिवाय नमः अर्घ्यं ।
ॐ वामदेवाय नमः ॐ नमः शिवाय श्रीसाम्बसदा० आचमनं० ॐ ज्येष्ठायनमः ॐनमः शिवाय श्रीसाम्बसदा० स्नानं० ।
यानंतर मूलमंत्राने व 'आप्यायस्व०' वगैरे मंत्रांनी पंचामृतस्नान घातल्यावर 'आपोहिष्ठा०' वगैरे तीन ऋचांनी शुद्धोदकाने प्रक्षालन करून अकरा आवृत्या किंवा एक आवृत्ति रुद्र म्हटल्यावर पुरुषसूक्त म्हणून गंध, कुंकू व कापूर यांनी सुवासिक केलेल्या पाण्याने अभिषेक करावा. अभिषेकानंतर 'ॐ नमः शिवाय' या मंत्राने आचमन देऊन अक्षतायुक्त जे तर्पण करावे, ते असे-
'ॐ भवं देवं तर्पयामि....'
यानंतर मूलमंत्राने आचमन करावे.
'ॐ रुद्रायनमः ॐनमः शिवाय० यज्ञोपवीतं' ।
इ० मूलमंत्राने आचमन करावे.
ॐ कालाय नमः । नमःशिवाय श्रीसाम्बसदाशिवायनमः चंदनं० ।
ॐकलाविकरणायनमः ॐ नमः शिवाय श्रीसाम्बसदाशिवायनमः पुष्पाणि० ।
यानंतर हजार किंवा एकशे आठ बिल्वपत्रे, सहस्त्रनामाने किंवा मूलमंत्राने वाहावीत.
'ॐबलायनमः ॐनमःशिवाय श्रीसाम्बसदाशिवायनमः धूपं ॐबलप्रमथनायनमः ।
ॐनमः शिवाय श्रीसाम्ब०दीपं० ।
ॐ सर्वभूतदमनायनमः ॐ नमः शिवाय नैवेद्य० ।
मूलमंत्राने व वैदिक मंत्राने नीरांजन लावावे.
'ईशानः सर्वविद्यानामिश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोधिपतिर्ब्रह्माशिवोमेअस्तु सदाशिवोम् ॐनमःशिवाय मंत्रपुष्पम्० । '
भवाय देवायनमः शर्वाय देवायनमः' वगैरे आठ व 'भवस्यदेवस्य पत्न्यै' इत्यादि आठ नमस्कार केल्यावर
'शिवायनमः रुद्राय० पशुपतये० नीलकण्ठाय० महेश्वराय० हरिकेशाय० विरूपाक्षाय० पिनाकिने० त्रिपुरांतकाय० शंभवे० शूलिने० महादेवाय०'
या बारा नाममंत्रांनी बारा पुष्पांजलि देऊन, मूलमंत्र म्हणत प्रदक्षिणा व नमस्कार ही करावीत. त्यानंतर मूलमंत्राचा १०८ जप करून,
'अपराधसहस्त्राणि० क्षमस्व०'
अशी प्रार्थना व
'अनेन पूजनेन श्रीसाम्बसदाशिवप्रीयताम्'
असे म्हणून पूजा संपवावी.