श्रवण नक्षत्राने युक्त असलेली श्रावणी पौर्णिमा, फक्त पौर्णिमा, हस्तनक्षत्राने युक्त असलेली पंचमी अथवा केवळ पंचमी-यापैकी कोणचाही जरी काळ असला तरी तो (उपाकर्माला) चालतो; म्हणून केवळ श्रवण नक्षत्र अथवा केवळ हस्तनक्षत्र-यांचा काळ त्यांनी उपाकर्माला घेऊ नये. श्रावणात जर काही अडचण (विघ्नदोष) असेल, तर भाद्रपदी पुनव अथवा पंचमी या काळावर ते (उपाकर्म) करावे. तिथीला खंड असेल, अथवा ती जर बारा घटकांहून अधिक असेल तर दुसर्या दिवसाची घ्यावी व बारा घटकांहून कमी असल्यास आदल्या दिवसाची घ्यावी, वगैरे निर्णय पूर्वी सांगितल्याप्रमाणे जाणावा.