मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
पत्रिकापूजन

धर्मसिंधु - पत्रिकापूजन

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आश्चिन शुद्ध सप्तमी, अष्टमी व नवमी या तिन्ही दिवशी पत्रिका पूजन करावे. या समयी सप्तमी इत्यादि तिन्ही तिथी सूर्योदयी जरी दोन घटका असल्या तरी घ्याव्या. त्याचे अधिवासन वगैरे प्रयोगाचा विस्तार कौस्तुभादि ग्रंथात पहावा. सप्तमीपासून तीन दिवसपर्यंत जे नवरात्रव्रत करतात त्याविषयी, सप्तमी सूर्योदयानंतर दोन घटकांहून अधिक व्यापिनी असेल ती घ्यावी. दोन घटकांहून जर कमी असेल तर आदल्या दिवसाची घ्यावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP