मार्गशीर्षापासून आरंभ करून दर रविवारी सौरव्रत (सूर्याचे) करावे. हे व्रत काम्य आहे. या व्रतांत जे पदार्थ खायचे ते येणेप्रमाणे-मार्गशीर्षातल्या दर रविवारी तुळशीची तीन पाने, पौषात तीन पले (१ पल = ४० मासे) तूप, माघात तीन मुठी तीळ, फाल्गुनात तीन पले दही, चैत्रात तीन पले दूध, वैशाखात शेण, ज्येष्ठात तीन ओंजळी पाणी, आषाढात तीन मिरी, श्रावणात तीन पले सातूचे पीठ, भाद्रपदात गोमूत्र, आश्विनात साखर आणि कार्तिकात शुद्ध हवि (भात) याप्रमाणे अनन्तोपाध्यायांचे पुत्र जे काशीनाथोपाध्याय त्यांनी रचिलेल्या धर्मसिन्धुसारातल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या कृत्यांचा निर्णय येथे संपला.