देवताविषयक पदे - भैरव
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
११७३.
( राग-केदार; ताल-दादरा )
जय जय भैरवा रे । ज० । तुझे भजन लागे सदैवा रे ॥ध्रु०॥
काळभैरव बाळाभैरव । बा० । टोळाभैरव बटुभैरव ॥१॥
नाना प्रकारींचे विखार । प्र० । तयाचा करितसे भैरी संहार ॥२॥
काळ काळाचा ही काळ । महाकाळाचा ही काळ ।
दास म्हणे तो हा क्षेत्रपाळ ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2011
TOP