देवताविषयक पदे - न्हाणी
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
( चाल-साधुसंतां० )
न्हाणी न्हाणी रामाते अरुंधती । ऋषिपत्न्या पाहूनि संतोषती ॥
रामलीला सर्वत्र मुनी गाती । स्नाना उदक यमुना सरस्वती ॥१॥
ज्याच्या चरणी कावेरी कृष्णा वेणी । ज्याच्या स्नेहे कपिलादि ऋषी मुनी ॥
त्या रामाते न्हाणीले प्रीतीकरुनी ॥२॥
ज्याच्या नामे उपदेश विश्वजनां । ज्याच्या स्मरणे काळादि करिते करुणा ।
ज्याच्या प्राप्तीस्तव करिती अनुष्ठाना । त्या रामाते न्हाणुनी फुंकी कर्णा ॥३॥
रमती योगी स्वरुपी आत्माराम । निशिदिनी चरणी असावा नित्यनेम ॥
त्या रामाचा पालख विश्वधाम । दास म्हणे भक्तीचे देई प्रेम ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2011
TOP