भारुडे - गाय
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
९१७. ( पद )
वृत्ति माझी गाय दृश्य हे सकळ खाय ।
दोहिली न जाय काय करणे रे ॥ध्रु०॥
रामीरामदास आस करुनि पाहे वास ।
तुझा मज ध्यास कां उदास रे रामा ॥१॥
९१८. ( अभंग )
कान्हो राख माझ्या गाई । पुढति पुढति लागेन पायी ॥ध्रु०॥
आशा ममता तृष्णा कल्पना । त्या मज नावरती ॥१॥
काम क्रोध यादवराया । बैल राख लागेन वायां ॥२॥
मद मत्सर हलगे दोन्ही । ते हि राखे सारंगपाणी ॥३॥
वासना वांठि ओढाळ जगी । तेणे डिविले सर्वांगी ॥४॥
रामदास म्हणे तूंते । देईन देहभावाचे जुते ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 10, 2013
TOP