मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
काला

देवताविषयक पदे - काला

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.



११४५.
देवाने केला तीरी बसून काला यमुनेच्या ।
चाल गड्या वडज्या वांकड्या अंथरा घोंगड्या सोडा गांठोड्या सिदोरीच्या ॥ध्रु०॥
उद्धव गोपाळ, गाई चंचळ, घेतला पळ, आपल्या बळं, पाय उचली ।
हरी करी मुरली, स्मरण तांतडी । तांतडी, लिंग, देहोडी, काळि तांबदी, हुंबरे दुरुन ।
हरी आळवी, बहु प्रीतीने हो मुक्ताई, । मुक्ताई, मच्छ कूर्माई, वराई नरसाई, वामन परसाई,
राम सगुण, । कृष्णाई आली धांउनि हो भिमरे । भिमरी बोल बोबडी, बरी ध्वनी येती
मुरलीच्या ॥१॥
गाठोड्या हो खर्‍या, सोडल्या बर्‍या, एकाच्या घार्‍या, एकाच्या पुर्‍या, पोळी भात ।
येकाचे ढेबर वरणांत । येकाचे वडे, एकाचे मुगवडे कोसल्यांत ।
एकाचे भाकरी पिठलं, पिठलं केलं, अमोल जालं, त्यांत लई तेल,
येकाची अंबिल कांदे मिरच्या ॥२॥
येक सोडी, गुळपापडी, तुप खिचडी, सांडगी कुरवडी, वर तेलाची शिदोरी, ।
सिदोरी, लाह्या पोह्याची होय गुळवडी, कानवला रोटी, काळी कुटतीची आवड
मोठी हरीला । एकाची दाळ नवरसाची । करंज्या फेण्या निरगुजी गव्हाची ।
साकर भाकर काकड, कानमोंडदी वान मिरच्या ॥३॥
रायते आंब्याचे, निंबाचे लोणचे हो आले । वाघाटी कुरटुले कारळे फळे तांबड्याचे ।
हारणदोडी, कवळ्याचे हो राताळू, सिंगटे पेंडाळु, चिकट तोंडाळ, बुरकुट केला बोराचा ।
घाटा केला मुकण्याचा, हो चला जेऊं वेळ जाला बहु, भजनी भावूं असूं द्या रे ।
सर्व बसा पंगती, ग्रास घ्या हाती, मध्ये श्रीपति होऊं द्या रे ।
वाकुल्या दावित जा रे, मुचमुचा, शीत सांडु नका, हात तुम्ही पुसा,  घोंगडिला घासा,
ब्रह्मा जाला मासा, बोले रामदास सत्य वाचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP