१००८.
( राग-खमाज; ताल-धुमाळी; चाल-असा कसा देवाचा० )
मंगळाचरण आरंभिला ॥ध्रु०॥
सरळशुंडा विघ्नवितंडा, चंड प्रचंडा सुबाहु दंडा ।
छेदुनि पिंडा, करुनि खंडा, वक्रतुंडा, याच पदी घालुनि मुरकुंडा ॥१॥
सगुणमंदिरी, दिव्य सुंदरी, करी किन्नरी, करी तनरी ।
रागोद्धारी, विद्यासागरी, परोपकारी, नमुं नमुं ते ब्रह्मकुमारी ॥२॥
अनाथनाथा, मीपणवार्ता, त्रासक कर्ता, अभाव गर्ता ।
पुरुनि तार्ता, मायिक हर्ता, सुखा दाविता, देवदास गुरु स्वामिसमर्था ॥३॥