मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग.

विविध विषय - भक्तिपर अभंग.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


४३१ .

ज्ञान जाले भक्तजनां । सांडूं नये उपासना ॥१॥

ऐका साराचेंहि सार । मुख्य सांगतो विचार ॥२॥

हेंचि सर्वांचे कल्याण । मानूं नये अप्रमाण ॥३॥

दास म्हणे अनुभविले । भजन भगवंताचे ॥४॥

४३२ .

ज्ञातेपणे आदी सांडी । जाण त्या नांव पाषांडी ॥१॥

देव पतितपावन । त्यासी करी अभिमान ॥२॥

ध्रुव प्रल्हाद आपुले । भक्त जेणे उद्धरिले ॥३॥

बहुसाल भूमंडळी । तारी भक्तांची मंडळी ॥४॥

जडमूढ सांगो किती । ज्याच्या नामे होते गति ॥५॥

रामीरामदास म्हणे । अंतकाळी सोडवणे ॥६॥

४३३ .

आत्मज्ञाने पारंगत । जाला बोलका महंत ॥१॥

तरि आदि सांडूं नये । देव भक्तासी उपाय ॥२॥

गुरुपद हातां आले । भूमंडळी सत्ता चाले ॥३॥

दास म्हणे ज्ञान जाले । सर्व मिथ्यासे कळले ॥४॥

४३४ .

सकळ कळा हातां आल्या । ऋद्धि सिद्धि ही वोळल्या ॥१॥

तरी आदि सांडूं नये । देव भक्ताचा उपाय ॥२॥

मनोसिद्धि वाचासिद्धि । जाली उदंड उपाधि ॥३॥

दास म्हणे राज्य जाले । इंद्रपद हातां आले ॥४॥

४३५ .

जीव शिव पिंडब्रह्मांडरचना । उभारुनि पुन्हां संहारावी ॥१॥

सर्व खटपट सांडूनियां मागे । भक्तीचेनीयोगे समाधान ॥२॥

वेदी कर्मकांड बोलिले उदंड । आटणीचे दंड आटाआटी ॥३॥

व्रते तपे दाने योगे धूम्रपाने । नाना तीर्थाटणे दास म्हणे ॥४॥

४३६ .

अनुभव वाचे बोलिले न आये । भावनेने काय भावूं आता ॥१॥

भावूं आतां देव कैसा निरवयव । म्हणोनियां भाव सगुणासी ॥२॥

सगुणासि भाव लावितां स्वभाव । पालटे अभाव दास म्हणे ॥३॥

४३७ .

अभक्त भोगिती यातना । देव राखे भक्तजनां ॥१॥

देव भक्त दोन्ही एक । यम देवाचा सेवक ॥२॥

भक्ती देव केला सखा । तोचि त्यांचा पाठिराखा ॥३॥

रामीरामदास म्हणे । भक्ति करा याकारणे ॥४॥

४३८ .

तुज कोठे पाहूं देवा । तुझी कैसी करुं सेवा ॥१॥

बहु देव पाहुनि आलो । बहुरुपे भांबावलो ॥२॥

किती देवालये मोडती । किती देव भंगुनी जाती ॥३॥

बहुतांच्या बोले गेलो । तेणे बहुत कष्टलो ॥४॥

रामीरामदास म्हणे । ऐसी जनांची लक्षणे ॥५॥

४३९ .

देव म्हणे मी जाणार नाही । आतां चिंता न करी कांही ॥१॥

मज पहावे संतांपांशी । सेवी जाणत्या भक्तांसी ॥२॥

मज जाणावे विचारे । सगुणाची भजनद्वारे ॥३॥

भक्तांसन्निध राहतो । योगक्षेमही वाहतो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP