मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| अध्यात्म विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - अध्यात्म श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ अध्यात्म Translation - भाषांतर ७८८.मुक्त निःसंदेह बद्ध तो संदेह । संदेहाचा देह कामा नये ॥१॥कामा नये चित्त दुश्चित्त सर्वदा । लागली आपदा संशयाची ॥२॥संशयाच्या संगे समाधान भंगे । खेद आंगी लागे अकस्मात ॥३॥अकस्मात सुख दुःख कालवले । साधकासी केले संदेहाने ॥४॥संदेहाचा घात करी एकसरा । दास म्हणे करा निरुपण ॥५॥७८९.ज्ञानेंविण जे जे कला । ते ते जाणावी अवकळा ॥१॥ऐसे भगवंत बोलिला । चित्त द्यावे त्याच्या बोला ॥२॥एक ज्ञानचि सार्थक । सर्व कर्म निरर्थक ॥३॥दास म्हणे ज्ञानेविण । प्राणी जन्मला पाषाण ॥४॥७९०.आम्ही सावधान गावे । तुम्ही सावध ऐकावे ॥१॥सकळ सृष्टीचा गोसावी । त्याची ओळखी पुसावी ॥२॥स्वये बोलिला सर्वेशु । ज्ञानेविण अवघे पशु ॥३॥दास म्हणे नाही ज्ञान । तया नरकी पातन ॥४॥७९१.जेणे ज्ञान हे नेणवे । पशु तयासी म्हणावे ॥१॥जेणे केले सचराचर । कोण सृष्टीस आधार ॥२॥कोणे प्रारब्ध निर्मिले । कोणे संसारी घातले ॥३॥ब्रह्मादिकांचा निर्मिता । कोण आहे त्यापरता ॥४॥अनंत ब्रह्मांडांच्या माळा । विचित्र भगवंताची कळा ॥५॥रामदासाचा विवेक । सर्वां घटी देव एक ॥६॥७९२.पावन असतां पतित जालासि । सोय चुकलासी पावनाची ॥१॥पावनाची सोय धरितां अंतरी । स्वरुप विचारी समाधान ॥२॥समाधान जाले पावनाने केले । आत्म निवेदिले दास म्हणे ॥३॥७९३.समर्थाचा दरिद्री सुत । याचे न करावे विपरीत ॥१॥परी समर्थलक्षण । सर्वकाळ समाधान ॥२॥श्रीमंताचे विद्येलागी । माधुकरी मागे जगी ॥३॥तैसे रामीरामदासी । ब्रह्मविद्येच्या सायासी ॥४॥७९४.पतित म्हणजे वेगळा पडिला । पावन तो जाला एकरुप ॥१॥एकरुप देव अरुप ठायींचा । तेथे दुजा कैंचा कोण आहे ॥२॥कोण आहे दुजा स्वरुपी पाहतां । विचारे राहतां सुख आहे ॥३॥सुख आहे मूळ आपुले शोधितां । मनासी बोधितां रामदास ॥४॥७९५.मायिकाची भक्ति उधाराची मुक्ति । तैसी नाही स्थिती राघवाची ॥१॥राघवाची कृपा सद्य मोक्षफळ । तुटे तळमळ चमत्कारे ॥२॥चमत्कार आतां जो कोण्ही पाहेना । त्याचा पंथ उणा कोटिगुणे ॥३॥कोटिगुणे उणे जिणे त्या नराचे । जेथे विचाराचे ओस घर ॥४॥ओस घरी वाण कासयासी द्यावे । व्यर्थ चि शिणावे कामेंविण ॥५॥कामेंविण काम तो हा आत्माराम । तेथेचि विश्राम पाविजेल ॥६॥पाविजेल परी विवरत जावे । सर्वहि सांडावे ओसरोनी ॥७॥ओळखतां त्याग सर्वांचा घडेल । मार्ग सांपडेल योगियांचा ॥८॥योगियांचा पंथ योगीच जाणती । तिन्ही ही प्रचीती ऐक्यरुप ॥९॥ऐक्यरुप आत्मशास्त्रगुरुवाक्य । हेंचि महावाक्य विवरोनी ॥१०॥७९६.जयाचा आहार त्यानेचि तो खावा । विपरीत देवा कामा नये ॥१॥कामा नये विधिवेगळे करणे । विवेके धरणे कोणीएक ॥२॥कोणीएक विद्या ब्रह्मज्ञानावीण । दास म्हणे सीण वाउगाचि ॥३॥७९७.भयानक स्वप्ने जया वाटे भय । तेणे निजो नये सर्व काळ ॥१॥सर्वकाळ जागा विवेकसंगती । तयासी कल्पांती भय नाही ॥२॥भय वाटे देही तूं तंव विदेही । देहातीत पाही आपणासी ॥३॥आपणासी नेणतां वाटे नाना चिंता । म्हणोनी दुश्चिता राहो नको ॥४॥राहो नको कदा या देहसंमंधी । मनी धरी शुद्धि स्वरुपाची ॥५॥७९८.देव तो कळेना राहिला चुकोनी । संसारा येउनी काय केले ॥१॥काय केले बापा आपुले अनहित । देखत देखत चुकलासी ॥२॥चुकलासी धणी या भूमंडळाचा । सर्वहि देवांचा मुख्य देव ॥३॥मुख्य देव आहे तो तुज कळेना । शाहणा आपणा म्हणवीसी ॥४॥म्हणवीसी परी दसर्याचे सोने । उणे कोटिगुणे दास म्हणे ॥५॥७९९.शोधुनी पहावे देवऋषिमूळ । निर्माण सकळ कोठुनीयां ॥१॥कोठुनियां जाली सर्वहि उपाधि । बरी घ्यावी शुद्धि शाश्वताची ॥२॥शाश्वताची शुद्धि घेता दृढबुद्धि । घेउनि समाधी हातां चढे ॥३॥हातां चढे सर्व वेदशास्त्रबीज । मुख्य गुह्य गुज योगियांचे ॥४॥योगियांचे गुज सहज सहज । दास म्हणे निज ठायी पाडी ॥५॥८००.दर्पणी पाहतां दिसते सर्वांग । परि पृष्ठिभाग आढळेना ॥१॥आपुलीच पाठी पाहतां न दिसे । ऐसे बोलतसे सर्व जन ॥२॥आपशुद्धि नेणे त्या काय परावे । म्हणोनि जाणावे आपणासी ॥३॥आपणासी जाणे संताचे संगती । तया अधोगति जन्म नाही ॥४॥नाही जन्ममृत्यु नाही येणे जाणे । स्वरुपी राहणे दास म्हणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 29, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP