मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
शिलंगण

भारूड - शिलंगण

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९८७.
द्वैता अद्वैताची सीमा । सीमा होति त्या निःसीमा ॥१॥
जाले सीमाउल्लंघन । साधुमुखे समाधान ॥२॥
कार्याकारणापरते । मने पाहिले निरुते ॥३॥
भक्ति नवविधाभजन । पुढे आत्मनिवेदन ॥४॥
निरुपणी निजध्यास । जाला वस्तूचा विश्वास ॥५॥
रामीरामदास म्हणे । संतसंगाचेनि गुणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP