मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
कलिवर्णन

विविध विषय - कलिवर्णन

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


१५४

आलें भगवंताच्या मना । तेथें कोणाचें चालेना ॥१॥

जैसा कलि राजा जाला । धर्म अवघाचि बुडाला ॥२॥

नीतिमर्यादा उडाली । भक्ति देवाची बुडाली ॥३॥

दास म्हणे पाप जालें । पुण्य अवघेंचि बुडालें ॥४॥

१५५

विप्रीं सांडिला आचार । क्षेत्रीं सांडिला विचार ॥१॥

आलें भग० ॥ध्रु०॥

मेघवृष्टि मंदावली । पिकें भूमीनें सांडिलीं ॥२॥

बहूवृष्टि अनावृष्टि । दास म्हणे गेली सृष्टि ॥३॥

१५६

लोक दोष आचरती । तेणें दोषें भस्म होती ॥१॥

आलें भग० ॥ध्रु०॥

जनीं दोष जाले फार । तेणें होतसे संहार ॥२॥

रामदास म्हणे बळी । दिसंदीस पाप कळीं ॥३॥

१५७

नाहीं पापाचा कंटाळा । येतो हव्यास आगळा ॥१॥

आलें भगवं० ॥ध्रु०॥

जना सुबुद्धि नावडे । मन धांवे पापाकडे ॥२॥

रामीरामदास म्हणे । पुण्य उणें पाप दुणें ॥३॥

१५८

पुण्यक्षेत्रें तीं मोडावीं । आणि ब्राम्हणें पीडावीं ॥१॥

आलें भग० ॥ध्रु०॥

पुण्यवंत ते मरावे । पापी चिरंजीव व्हावे ॥२॥

रामदास म्हणे वाड । विघ्नें येतीं धर्माआड ॥३॥

१५९

लोक भेणेंचि चालती । त्यांस होताती विपत्ति ॥१॥

आलें भग० ॥ध्रु०॥

धर्मवृत्ति ते बुडावी । शास्त्रमर्यादा उडावी ॥२॥

रामदास म्हणे देवें । बौद्ध होउनी बैसावें ॥३॥

१६०

ज्याच्या उदरासि आला । त्यासि फिरोनी पडला ॥१॥

तोचि जाणावा चांडाळा । देवां ब्राह्मणांचा काळ ॥ध्रु०॥

जाला स्त्रियेसी लंपटु । मायबापांसी उद्धटु ॥२॥

भय पापाचें न धरी । सज्जनांची निंदा करी ॥३॥

नेणे माय कीं मावशी । कोणें सांगावें तयासी ॥४॥

रामीरामदास म्हणे । यम केला त्याकारणें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP