मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| पंचीकरण विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - पंचीकरण श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ पंचीकरण Translation - भाषांतर ७५१.मायेचे स्वरुप ब्रह्मी उद्भवले । तिच्या पोटां आले महत्तत्त्व ॥१॥महत्तत्त्वी सत्व सत्त्वी रजोगुण । तिजा तमोगुण रजापोटी ॥२॥पोटां पंचभूते तयाचिया आली । दास म्हणे जाली सृष्टि ऐसी ॥३॥७५२.पांच ही प्रळय सांगईन आतां । जाणिजे तत्त्वता दोनी पिंडी ॥१॥दोनी पिंडी दोनी ब्रह्मांडी प्रळय । पांचवा अन्वय विवेकाचा ॥२॥विवेकाचा पंथ विवेकी जाणावा । योगियांचा ठेवा निरुपणी ॥३॥निरुपणी निद्राप्रळय बोलिला । दुजा मृत्यु जाला प्राणियांसी ॥४॥प्राणियांसी पिंडी हे दोन्ही प्रळय । ब्रह्म निद्राक्षय ब्रह्मयाचा ॥५॥ब्रह्मयाचा क्षय तो ब्रह्मप्रळय । व्यतिरेकान्वय विवेकाचा ॥६॥विवेकाचा अर्थ माईक सर्वही । सस्वरुपी नाही चराचर ॥७॥चराचर पंचभूतिक माईक । सिद्ध हा विवेक सज्जनांचा ॥८॥सज्जनांचा भाव सर्व दृश्य वाव । दृश्यातीत देव जैसा तैसा ॥९॥जैसा तैसा देव तोचि ओळखावा । प्रळय पांचवा दास म्हणे ॥१०॥७५३.अनावृष्टि धरा शतसंवत्सर । तेणे जीवमात्र संहारती ॥१॥संहारती कोणी नसे भूमंडळी । सूर्य बाराकळी तपईल ॥२॥तपईल तेणे जळेल धरणी । कां द्रव्याचे फणी पोळईल ॥३॥पोळईल तेणे विषांचे हळाळ । मार्तंडाचे ज्वाळ एक होती ॥४॥होती गिरिश्रृंगे सर्व भस्मरुप । तयांलागी आप बुडवील ॥५॥बुडईल धरा जळचि निखळ । तयासी अनळ सोखूं पाहे ॥६॥सोखूं पाहे जळा उरला अनळ । तयासी अनीळ विझविता ॥७॥विझवीता होय वायु त्या वन्हीसी । विश्रांती वायूसी नभापोती ॥८॥नभापोटी चारी भूते सामावली । नभाकार जाली वृत्ति तेव्हां ॥९॥वृत्ति नभा ऐसी आडळे अन्वय । पांचवा प्रळय दास म्हणे ॥१०॥७५४.कल्पनेचे पोटी अष्टविध सृष्टि । तेचि आतां गोष्टी सांगईन ॥१॥सांगईन सृष्टि एक कल्पनेची । दुजी ते शब्दाची शब्दसृष्टि ॥२॥शब्दसृष्टि दुजी तिजी ते प्रत्यक्ष । चौथी जाण लक्ष चित्रलेप ॥३॥चित्रलेप चौथी पांचवी स्वप्नींची । सृष्टि गंधर्वाची सहावी ते ॥४॥सहावी ते सृष्टि गंधर्वनगर । सातवी ते ज्वरसृष्टि जाण ॥५॥सृष्टि जाण दृष्टिबंधन आठवी । सर्व ही मानवी काल्पनीक ॥६॥काल्पनिक अष्टसृष्टीचे स्वरुप । शुद्ध सस्वरुप निर्विकल्प ॥७॥निर्विकल्प देव कल्पनेरहित । जाणिजे स्वहित हेंचि बापा ॥८॥हेंचि बापा बुझे संतांचे संगती । चुके अधोगती दास म्हणे ॥९॥७५५.देवाचिये पोटी आयुष्याच्या कोटी । ऐशा किती सृष्टी होती जाती ॥१॥होती जाती किती रंक जीव जंतु । परी तो अनंतु जैसा तैसा ॥२॥जैसा तैसा देव आम्हां सांपडला । संदेह तुटला फुटायाचा ॥३॥फुटायाचा भाव फुटोनियां गेला । थोर लाभ जाला शाश्वताचा ॥४॥शाश्वताचा लाभ रामीरामदासी । कल्पांती तयासी भय नाही ॥५॥७५६.शरीराची तत्वे तत्वांचे शरीर । पाहावा विस्तार विस्तारोनी ॥१॥विस्तारुनी गुंती तत्त्वांची मांडणी । सिद्धांते झाडणी आरंभावी ॥२॥आरंभिता तत्वे तत्व वेगळाले । मीपण गळाले विवेकाने ॥३॥विवेके पाहातां कोणीच नाडळे । समजतां कळे सर्व कांही ॥४॥सर्व कांही लाभ होती निरुपणे । श्रवणमनने दास म्हणे ॥५॥७५७.सावधान व्हावे विवेका पहावे । वायोच्या स्वभावे सर्व कांही ॥१॥सर्व कांही घडे वायोचि करितां । वायो पाहो जातां आडळेना ॥२॥आडळेना वायो आकाशी विराला । कर्ता काय जाला अंतरीचा ॥३॥अंतरीचा सर्व विवेक पाहातां । ब्रह्मरुप आतां सहजचि ॥४॥सहजचि जाले विचाराने केले । माणुस पाहिले शोधुनीयां ॥५॥शोधुनीयां जीत माणूस पहावे । वर्म पडे ठावे दास म्हणे ॥६॥७५८.माझे थोरपण वेद वाखाणिती । ऐसी एह प्रचीति सिद्ध आतां ॥१॥सिद्ध आतां बोध देखतदेखतां । होते सार्थकता शीघ्रकाळे ॥२॥शीघ्रकाळे काळ सर्व संहारला । अनुभव आला रोकडाचि ॥३॥रोकडाचि आतां तुम्ही तरी पाहा । विवेकाने आहा काय नेणो ॥४॥नेणो महिमान विवेकी जनांचे । होय सज्जनांचे मूळस्थान ॥५॥मूळस्थान मूळ होइजे केवळ । कोण रे चांडाळ मिथ्या बोले ॥६॥मिथ्या बोलवेना पहा विवंचना । सिद्ध अनुमाना कैसे येते ॥७॥कैसे येते आत्मप्रचीती आपण । मीतूं ऐसे कोण सांग बापा ॥८॥सांग बापा मनी बरे विचारुनि । तत्त्वांची झाडणी करुनीयां ॥९॥करुनियां पंचीकर्णविवरण । पुढे मीतूंपण कोठे आहे ॥१०॥आहे तैसे आहे प्रत्यये जाणावे । कोणासी म्हणावे काय आतां ॥११॥काय आतां होते बहु बोलोनियां । घेतलेसे जाया सर्व कांही ॥१२॥सर्व कांही आहे दृश्य जाइजणे । माझे मीच जाणे कोण सांगो ॥१३॥कोणा सांगो आतां हे कोण घेईल । वायांचि जाईल अभिमाने ॥१४॥अभिमाने सत्य राम कोपताहे । सिद्धचि न लाहे आत्मरुप ॥१५॥आत्मरुप स्वये आपण नव्हीजे । तरी वायां कीजे रामदास्य ॥१६॥रामदास्य आणि हे वाक्य जाईल । ऐसे न घडेल कदाकाळी ॥१७॥कदाकाळी राम दासां उपेक्षीना । रामउपासना ऐसी आहे ॥१८॥ऐसी आहे सार राघवाची भक्ति । विभक्तिची भक्ति तेथे नाही ॥१९॥तेथे नाही कांही वाउगे माईक । रामउपासक रामदास ॥२०॥७५९.अंती पंचभूते पांचांसी मिळाली । वासना राहिली कोणे ठायी ॥१॥कोणे ठाई तेव्हां वासना हे राहे । कैसे रुप आहे वासनेचे ॥२॥वासनेचे रुप सूक्षम जाणावे । संकल्प स्वभावे रुप तिचे ॥३॥रुप तिचे अंतकाळी कोठे राहे । अनुभवे पाहे आपुलिया ॥४॥आपुला संकल्प जये वस्तूवरी । तेथे वस्ति करी वासना हे ॥५॥वासना हे वस्ति करी अगोदर । जंव कळेवर सचेतन ॥६॥सचेतन काया कारणी लावावी । वासना गोवावी रामरुपी ॥७॥रामरुपी सत्य संकल्प धरावा । संसार तरावा अवळीला ॥८॥अवलीळा भवसागर ओसरे । जरी मनी धरे गुरुवाक्य ॥९॥गुरुवाक्ये गति रामदासी जाली । मुक्ति हे लाधली सायोज्यता ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP