मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पाळणा

देवताविषयक पदे - पाळणा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


१०२४.
जो जो जो रे श्रीरामा ॥ निज सुख गुण विश्रामा ॥ध्रु०॥
ध्याती मुनि योगी तुजलागी ॥ कौसल्या ओसंगी ॥१॥
वेदशास्त्रांची मती जाण ॥ स्वरुपी जाली लीन ॥२॥
चारी मुक्तींचा विचार । चरणी पहाती थोर ॥३॥
भोळा शंकर निशिदिनी ॥ तुजला जपतो ध्यानी ॥४॥
दास गातसे पाळणा । रामा लक्षूमणा ॥५॥

१०२५.
( राग-सारंग; ताल-धुमाळी )
हळुहळू गाईं निज रे बाळा ।
मोठा जटाधारी गोसावी आला ॥ खरचरभूजा जा रे फकीरा ।
निजला माझा पालखी हीरा ॥ हळुहळूं गा० ॥१॥
नको येऊं रे बागुलबावा । निजला माझा पालखी रावा ॥
सगुण गुणाचे बालक माझे । कोणी दावा हो यासम दूजे ॥
हळुहळूं गा ॥२॥
लागली दृष्टी कोण्या पापिणीची । उतरे प्रभा मुखचंद्राची ॥
हालवी कौसल्या प्रेमपान्हा । दास म्हणे आला वैकुंठराना ॥
हळुहळूं गा० ॥३॥

१०२६.
( राग-काफी; ताल-दादरा )
साजिरे हो रामरुप साजिरे हो ॥ध्रु०॥
रुप प्रगटले लावण्य लाजले मानसी बैसले ॥१॥
सर्वांगसुंदर ठाण मनोहर दासाचा आधार ॥२॥

१०२७.
वदन सुहास्य रसाळ हा राघव ।
सर्वांगी तनु सुनीळ हा राघव ॥ध्रु०॥
मृगनाभी रेखिला टिळा हा राघव ।
मस्तकी सुमनमाळा हा राघव ॥१॥
साजिरी वैजयंती हा राघव ।
पायी तोडर गर्जती हा राघव ॥२॥
सुंदर लावण्यखाणी हा राघव ।
उभा कोदंडपाणी हा राघव ॥३॥
सकल जीवांचे जीवन हा राघव ।
रामदाससि प्रसन्न हा राघव ॥४॥

१०२८.
( ताल-दादरा; चाल-कामदावृत्ताची. )
आठवे मनी आठवे मनी राम चिंतनी ॥ध्रु०॥
मुकुट कीरिटी वक्र भृकुटी । रम्य गोमटी नयनांबुजे ॥१॥
मकरकुंडले ठाण दंडले । तेज खंडले मेघदामिनी ॥२॥
रम्य रंगले चाप चांगले । सैन्य भंगिले त्रिकुटाचळी ॥३॥
बाणली उटी कास गोमटी । किंकिणी कटी क्षुद्र घंटिका ॥४॥
पदकमालिका फांकती किळा । रुळती गळां मुक्त मालिका ॥५॥
ते सुलक्षण रत्नभूषण । वीरकंकणे शोभती करी ॥६॥
अंदु नेपुरे वांकि गजरे । ती मनोहरे पाउले बरी ॥७॥
हृदयकमळी मूर्ति सांवळी । दास न्याहळी कुळदैवत ॥८॥

१०२९
 ( राग-भैरव; ताल-भजनी केरवा )
रे दयाळा ॥ध्रु०॥
नवरत्नमाळा कंठी आंगी चंदनउटी । कस्तुरीमळवटु लल्लाटी ॥१॥
हृदयीचे पदक जडित अमोलिक । रविहुनि तेज अधिक ॥ रे० ॥२॥
जडित मंचकावरी शामसुंदर हरी । सन्निध नारद गायन करी ॥३॥
विप्ररामदासाशिरी स्वामी तो श्रीहरी । कृपा करी रे दीनावरी ॥ रे० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP