मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
वृत्ति

भारूड - वृत्ति

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९७५.
वृत्ति बुडाली बुडाली जीत असतां मेली ।
माया व्याली रे व्याली विऊन वांझ जाली ॥ध्रु०॥
माया नाही रे नाही रे पूर्वीपासुन यासी ।
विलंब जाला रे जाला गोंविला विदेसी ।
हळहळ केली रे केली रे नचले अदृष्टासी ।
टाकुनि गेला रे गेला रे वृत्तिसीमा ऐसी ॥१॥
ज्ञान कैचे रे कैंचे रे नेणत्या जीवासी ।
वेड लागले लागले होते त्या श्रेष्ठासी ।
तेणे लाविले लाविले न करितां सायासी ।
संग दुल्लभ रे दुल्लभ रे परि सोडिल तयासी ॥२॥
लाज सांडिले ज्येष्ठा अभिमानाची ।
आस लागली लागली हो ते कनिष्ठाची ।
तेहि तूटली तूटली लुलु ममत्वाची ।
वृद्धि खुंटली खुंटली रामदासाचे वोळीची ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP