मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| अध्यात्म विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - अध्यात्म श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ अध्यात्म Translation - भाषांतर ८६१.नित्य निरंतर सर्वांचे अंतर । तोचि निराकार बोलिजेतो ॥१॥बोलिजेतो संत महंत जाणती । खुणेसी बाणती विवंचिता ॥२॥विवंचिता राम रामचि होइजे । ये गोष्टीची कीजे विचारणा ॥३॥विचारणा सार विचारे उद्धार । साधु योगेश्वर विचारेंचि ॥४॥विचारेंचि जनी होतसे सार्थक । धन्य हा विवेक दास म्हणे ॥५॥८६२.ब्रह्म हे जाणावे निर्मळ निश्चळ । व्यापक पोकळ व्योमाकार ॥१॥व्योमाकार ब्रह्म बोलताती श्रुति । पाहो जातां मती तदाकार ॥२॥तदाकार मती श्रवणे होईल । संदेह जाईल अंतरींचा ॥३॥अंतरींचा भाव निर्मळ लागतां । होइजे तत्त्वतां निर्मळचि ॥४॥निर्मळचि होणे निर्मळाच्या गुणे । श्रवणे मनने दास म्हणे ॥५॥८६३.ब्रह्म हे निर्गुण मुळी निराकार । तेथे चराचर कैसे जाले ॥१॥जाले निराकारी अहंतास्फुरण । एकी एकपण प्रगटले ॥२॥प्रगटले एक आकार नसतां । निर्गुणी अहंता कोणे केली ॥३॥कोणी नाही केली सर्वही माईक । निर्गुण ते एक जैसे तैसे ॥४॥जैसे तैसे सर्व माईक रचले । निराकारी जाले कोणेपरी ॥५॥परी हे नाथिली साच मानूं नये । नाही त्यासि काय पुससील ॥६॥पुससील काय वांझेची लेंकुरे । मृगजळपुरे वाहवसी ॥७॥वाहावसी वायां मुळाकडे पाही । मुळी तेथे कांही जाले नाही ॥८॥नाही कां म्हणतां प्रत्यक्ष दिसते । सत्यत्वे भासते चराचर ॥९॥चराचर सत्य हे कईं घडेल । अंधारी बुडेल रविबिंब ॥१०॥बिंबताहे मनी दिसते लोचनी । ते कैसे वचनी मिथ्या होय ॥११॥मिथ्या होय स्वप्न जागृति आलिया । तेचि निजलीयां सत्य वाटे ॥१२॥सत्य वाटे मिथ्या मिथ्या वाटे सत्य । ऐसे आहे कृत्य अविद्येचे ॥१३॥अविद्येचे कृत्य तुम्हीच सांगतां । मागुते म्हणतां जाली नाही ॥१४॥नाही जाले कांही दृष्टीचे बंधन । तैसे हे अज्ञान बाधीतसे ॥१५॥बाधीतसे परी सर्वहि नाथीले । कांही नाही जाले ज्ञानियांसी ॥१६॥ज्ञानियांसी दृश्य दिसते की नाही । देहचि विदेही कैसे जाले ॥१७॥जाली विदेहता देहींच असतां । दिसते पहातां सर्व मिथ्या ॥१८॥मिथ्या हे सकळ मज हे वाटेना । संशयो तुटेना अंतरीचा ॥१९॥अंतरी संशयो तुटे संतसंगे । कृपेचेनि योगे दास म्हणे ॥२०॥८६४.पहिले प्रथम मुळी परब्रह्म । व्यापक सूक्ष्म जेथे तेथे ॥१॥जेथे तेथे वस्तु आहे निराकार । शुद्ध व्योमाकार प्रगटित ॥२॥प्रगटीत आहे दिसेना ना नासे । विचारे विलसे ज्ञानियांसी ॥३॥ज्ञानियांसी ज्ञाने कळे निरंजन । आणि जन वन सारिखेचि ॥४॥सारिखेंचि आहे देवा ओळखतां । जेथे तेथे जातां देव भासे ॥५॥देव भासे मनी नित्य निरंतर । बाह्य अभ्यंतर व्यापुनीयां ॥६॥व्यापुनियां आहे सर्वांचे अंतरी । अनुभवे हरी ओळखावा ॥७॥ओळखावा परी ओळखतां नये । म्हणोनि उपाय साधुसंग ॥८॥साधुसंग धरी श्रवण विवरी । सारासार करी विचारणा ॥९॥विचारणा करी देवांब्राह्मणांची । आणि सगुणाची उपासना ॥१०॥उपासना कर्म हे आधी पाळावे । मग सांभाळावे ब्रह्मज्ञान ॥११॥ब्रह्मज्ञान नसे ते जन आंधळे । सन्मार्गी पांगुळे क्रियाभ्रष्ट ॥१२॥क्रियाभ्रष्ट कर्म उपासनेविण । नेणतां निर्गुण सर्व मिथ्या ॥१३॥सर्व मिथ्या जंव ब्रह्मज्ञान नाही । क्रियाकर्म कांही सोडवीना ॥१४॥सोडवीना कर्म या कर्मापासूनी । भगवंतांवाचूनी तारांबळी ॥१५॥तारांबळी जाली देवासी नेणतां । कर्मी गुंडाळता देव कैंचा ॥१६॥देव कैंचा भेटे कर्म उफराटे । संशयोचि वाटे सर्वकाळ ॥१७॥सर्वकाळ गेला संशयी पडता । नित्य चोखाळितां कळेवर ॥१८॥कळीवर काय नित्य धूत गेला । लावितो कोणाला उपकार ॥१९॥उपकार कैंचा सेवक देहाचा । आणि कुटुंबाचा भारवाही ॥२०॥भारवाही जाला देवासी चुकला । लौकिकचि केला जन्मवरी ॥२१॥जन्मवरी केले अंती व्यर्थ गेले । कासावीस जाले वांयांवीण ॥२२॥वांयांवीण काळ गेला की निर्फळ । कर्म हे सबळ सुटेना की ॥२३॥सुटेना की कर्म कोण सोडवीता । सांडूनी अनंता कर्म केले ॥२४॥कर्म केले देह चालतां निर्मळ । खंगतां ओंगळ देह जाले ॥२५॥देह जाला क्षीण सदा हागवण । मृत्तिकेचा सीण कोण करी ॥२६॥कोण करी तेव्हां कर्माचे पाळण । जाली भणभण शरीराची ॥२७॥शरिराची जाली जेव्हां भणभण । तेव्हां नारायण भजो पाहे ॥२८॥भजो पाहे तेव्हां नारायण कैंचा । गेला अभ्यागाचा सर्वकाळ ॥२९॥सर्वकाळ गेला देव न भजतां । देह चोखाळितां चोखाळेना ॥३०॥चोखाळेना देह वाढवी संदेह । अंतकाळी पाहे दैन्यवाणा ॥३१॥दैन्यवाणा देह देवा न भजतां । लेट तुला आतां कोण सोडी ॥३२॥कोण सोडी देव धुंडिल्यावांचोनी । म्हणोनी भजनी सावधान ॥३३॥सावधानपणे देवासी शोधावे । तेणेंचि साधावे परलोक ॥३४॥परलोक साधे संतांचे संगति । चुके अधोगति गर्भवास ॥३५॥गर्भवास चुके ज्ञान अभ्यासितां । वस्तूसी पाहतां वस्तुरुप ॥३६॥वस्तुरुप होणे विवेकाच्या गुणे । नित्य निरुपणे सारासार ॥३७॥सारासारे घडे असाराचा त्याग । योगिये निःसंग सहजचि ॥३८॥सहजचि कर्मापासुनी सुटला । बोध निवटला परब्रह्मी ॥३९॥परब्रह्मी हेतु लागतां अहेतु । देही देहातीतु रामदास ॥४०॥८६५.ओंवीचेनि मिसे स्वरुपासि जावे । सत्वर पावावे समाधान ॥१॥समाधान नाही स्वरुपावांचोनी । म्हणोनिया मनी तेंचि असे ॥२॥तेंचि असे रुप निर्गुण रामाचे । सुख विश्रामाचे समाधान ॥३॥समाधान योगी ते हे सुख भोगी । मनी वीतरागी याचि सुखे ॥४॥याचि सुखे नर जो पाही निवाला । तोचि आहाळला फार दुःखे ॥५॥दुःख शोक नाही राम आठवीतां । अमृत सेवितां मृत्यु नाही ॥६॥नाही जन्म मृत्य अभेद भक्तांसी । रामीरामदासी अनुभव ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 29, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP