मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| अध्यात्म विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - अध्यात्म श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ अध्यात्म Translation - भाषांतर ८८१.राम अवघाचि आपण । दुजे कैंचे कोठे कोण ॥१॥द्वैत अद्वैताचे ठायी । भासमात्र हे नवई ॥२॥हो कां द्वैतासारिखे । काय अद्वैत पारखे ॥३॥रामदास आदिअंती । एकामध्ये कैंची भ्रांती ॥४॥८८२.देवेंविण आतां मज कंठवेना । कृपाळू तो नाना ठायी वसे ॥१॥नाना ठायी देव आहे जेथे तेथे । तयाविण रिते स्थळ नाही ॥२॥स्थळ नाही रिते ब्रह्म ते पुरते । जेथे जावे तेथे मागे पुढे ॥३॥मागे पुढे ब्रह्म सर्वत्र व्यापक । दास तो निःशंक तेणे गुणे ॥४॥८८३.चिंता काय आतां स्वप्नींचे सुखाची । सर्व चाले तोंचि ब्रह्म दिसे ॥१॥ब्रह्म दिसे तरी ज्ञाते न मानिती । दास म्हणे चित्ती पालटेना ॥२॥८८४.सकळांसी आधार पृथ्वीचा । पृथ्वीस आधार शेषाचा ।शेषास आधार कूर्माचा । आणि वराहो ॥१॥तिघां आधार आवर्णोदकाचा । आवर्णोदकासी आधार तेजाचा । तेजास आधार वायोचा अनुक्रमे ॥२॥सकळांस आधार भगवंताचा । महिमा कळेना जयाचा ।रुप पाहतां मनाचा । वेग राहे ॥३॥८८५.प्रगट ना गुप्त । व्यक्त ना अव्यक्त । आदि मध्य अंत । सारिखेचि ॥१॥सारिखेंचि वाटे । देह जेथे आटे । दुजेपण तुटे । एकत्वेसी ॥२॥एकी एकपण । उजेडासी आले । तेणे गुणे गेले । दुजेपण ॥३॥एक दोन तीन । पांच पंचवीस । खेळे सावकाश । मायादेवी ॥४॥माया हे माईक । सबळ वाटे तया । आत्मज्ञान जया । प्राप्त नाही ॥५॥नाही ओळखिले । आप आपणांसी । माया अज्ञानासी । वेढा लावी ॥६॥वेढा लावीयेले । मायेने जीवासी । आत्माजीवपदासी । आला नाही ॥७॥आले मेले गेले । आपणा कळले । तयातीत राहिले । आपरुप ॥८॥रुप अनुभवितां । नाही ज्ञेय ज्ञाता । अनुभव तत्त्वतां । तोही नुरे ॥९॥रामीरामदास । रामरुपी विरे । पाहे राही नुरे । जो जो दिल्हा ॥१०॥८८६.स्वानुभवाचे पालवे । शून्य गाळिले आघवे ॥१॥सघनी हारपले गगन । सहज गगन सघन ॥२॥शुद्धरुप स्वप्रकाश । अवकाशवीण आकाश ॥३॥रामीरामदास म्हणे । स्वानुभवाचिये खुणे ॥४॥८८७.अवघे ब्रह्ममय रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव नोहे कैसा ॥१॥सगुण हे ब्रह्म निर्गुण हे ब्रह्म । पाहतां मुख्य वर्म ब्रह्ममय ॥२॥नाही द्वैत भेद मिथ्या कां भ्रमसी । सत्य माया ऐसी मानूं नये ॥३॥मृगजळ डोळां दिसे परि नासे । तैसा हा विलास दिसताहे ॥४॥दास म्हणे देहबुद्धि हे त्यागावी । एकत्वे रंगावी मनोवृत्ति ॥५॥८८८.ओळखतां ज्ञान ओळखी मोडली । भेटी हे जोडली आपणासी ॥१॥आपणासी भेटी जाली बहुदिसां । तुटला वळसा मीपणाचा ॥२॥मीपणाचा भाव भावे केला वाव । दास म्हणे देव प्रगटला ॥३॥८८९.मत्स्ये जावे कोणीकडे । पाणी जिकडे तिकडे ॥१॥आंत पाणी बाह्य पाणी । नाही पाणियाची वाणी ॥२॥पुढे पाणी मागे पाणी । वाम सव्य अवघे पाणी ॥३॥पाणीयाचा मासा जाला । देहभाव हारपला ॥४॥रामदास पाणी जाला । नामरुपा हरपला ॥५॥८९०.माझे मीतूंपण विवेकाने नेले । देवाजीने केले समाधान ॥१॥मी देह म्हणतां केल्या येरझारा । चुकविला फेरा चौर्यांसीचा ॥२॥आपुल्या सुखाचा मज दिल्हा वांटा । वैकुंठीच्या वाटा कोण धांवे ॥३॥देवासी नेणतां गेले बहु काळ । सार्थकाची वेळ एकाएकी ॥४॥एकाएकी एक देव सांपडला । थोर लाभ जाला काय सांगो ॥५॥८९१.योगियांचा देव मज सांपडला । थोर लाभ जाला एकाएकी ॥१॥एकाएकी एक त्रैलोक्यनायक । देखिला सन्मूख चहुंकडे ॥२॥चहुंकडे देव नित्यनिरंतर । व्यापुनी अंतर समागमे ॥३॥समागम मज रामाचा जोडला । वियोग हा केला देशधडी ॥४॥देशधडी केला विवेके वियोग । रामदासी योग सर्वकाळ ॥५॥८९२.अलभ्याचा लाभ अकस्मात जाला । देव हा वोळला एकाएकी ॥१॥एकाएकी सुख जाहले एकट । व्यर्थ खटपट साधनांची ॥२॥साधनाची चिंता तुटली पाहतां । वस्तुरुप होतां वेळ नाही ॥३॥वेळ नाही मज देवदरुशणा । सन्मुखचि जाणा चहूंकडे ॥४॥चहूंकडे मज देवाचे स्वरुप । तेथे माझे रुप हरपले ॥५॥हरपले चित्त देवासी चिंतीतां । दास म्हणे आतां कोठे आहे ॥६॥८९३.आतां किती बोलो धालो तृप्त जालो । विवेके विरालो परब्रह्मी ॥१॥परब्रह्मी जातां ब्रह्मचि तत्त्वतां । विचारे पाहतां आपणचि ॥२॥आपणचि असे कोणीच न दिसे । संशयाचे पिसे वाव जाले ॥३॥वाव जाले भय सर्व संसारीचे । लाधले हरीचे निजधाम ॥४॥निजधाम बोधे विवेके पहावे । दास जीवेभावे सांगतसे ॥५॥८९४.धन्य माझे भाग्य जाले सफलित । देव सप्रचित जेथे तेथे ॥१॥जेथे तेथे देव येर सर्व माव । माझा अंतरभाव निवळला ॥२॥निवळला भाव निर्गुणी लागतां । विवेके जाणतां नित्यानित्य ॥३॥नित्यानित्य बरे शोधुनी पाहिले । मन हे राहिले समाधाने ॥४॥समाधाने मन जाहेले उन्मन । शुद्ध ब्रह्मज्ञान रामदासी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 29, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP