मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
टिपरी

भारूड - टिपरी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९४३.
( राग भैरवी; ताल-धुमाळी )
जाणवेना जाणवेना । जाणसी तरी सांगवेना ॥ध्रु०॥
अंतराळी एक देऊळ पाहे । पैल कळसावरुता देवो रे ॥१॥
देवासि पूजितां देऊळचि वाव । पुसे तयाचा ठाव रे ॥२॥
देवासि पूजितां देऊळचि पाडिले । ऐकुनि धांवली माय रे ॥३॥
देउळाखाली दडपलि तेणे । भक्ताचा जीव जाय रे ॥४॥
बागुले बागुल मारियेला तेणे । लेंकुरासि आनंद जाला रे ॥५॥
अमृतसागरी बुडोनि गेला । दास तो जीत ना मेला रे ॥६॥

९४४.
ऐक रे खेळिया तुजला सांगतो आपुले स्वहित करी रे ।
घडीने आयुष्य नेतो काळ लागला मापारी रे ॥ध्रु०॥
एक कोंडे असतां दुसरे केंवि संसार कोडे उगवी रे ।
काळ हा कोणासी आवरेना । तूं तयासी वेढां लावी रे ॥२॥
शरीर जायाचे मागोनि आणिले आपणांसि हे भोगिना रे ।
आपुले निजरुप ठायी न पडतां अक्षयसुख लाभेना रे ॥३॥
ऐसेचि खेळुनि उदंड गेले आम्हां तुम्हां पाड काई रे ।
रंग हा वोरंग होऊनि जाईल आपणासि ठाईं पाडी रे ॥४॥
रामदास निरोप सांगोनि गेला चला पाहूं आपणाला रे ।
टिपरीकर हे आपण घालिती सांडोनि जाऊं मनाला रे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP