मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| अर्चन विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - अर्चन श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथाभूपाळीसमर्थ अर्चन Translation - भाषांतर अर्चन.५८४.पूज्य देवाची प्रतिमा । त्याची न कळे महिमा ॥१॥देव भक्तांचा विश्राम । त्यासी नेणे तो अधम ॥२॥नाना स्थाने भूमंडळी । कोणे सांगावी आगळी ॥३॥ज्याचे चरणीचे उदके । धन्य होती विश्वलोके ॥४॥ज्याची चरित्रे ऐकतां । जनी होय सार्थकता ॥५॥रामीरामदास म्हणे । धन्य होइजे स्मरणे ॥६॥६.वंदन.५८५.प्रेमाचिया सन्निधाने । देव आले साभिमाने ॥१॥आतां आनंद आनंद । देवा भक्ता नाही भेद ॥२॥मुख्य पूजा परंपरा । केला दासासी अधिकारा ॥३॥दास पाऊले वंदितो । सदा सन्निध राहतो ॥४॥७.दास्य.५८६.कोणीएके आधी देवासी भजावे । तेणे पडे ठावे सर्व कांही ॥१॥सर्व कांही चिंता देवचि करितो । स्वये उद्धरितो सेवकांसी ॥२॥सेवकांसी काय कळे देवेविण । साधनाचा शीण वाउगाची ॥३॥वाउगाची शीण हे आले प्रचीती । देव आदि अंती सांभाळितो ॥४॥सांभाळितो देव तेथे जाला भाव । देवचि उपाव साधकांसी ॥५॥सेवकांसी कांही न चले उपाय । दाखविली सोय साभिमाने ॥६॥५८७.आपुल्या भजने पोटहि भरेना । लागे उपार्जना दुसर्याची ॥१॥दुसर्याची सेवा करितां वेतन । पाविजेतो अन्न लोकांमध्ये ॥२॥लोकांमध्ये उपासितां देह दारा । मागावा मुशारा कोणापाशी ॥३॥कोणापाशी कोणे काय हो सांगावे । कैसेनि मागावे वेतनासी ॥४॥वेतनासि जनी तरीच पाविजे । जरी सेवा कीजे स्वामियाची ॥५॥स्वामियाची सेवा करितां उत्पन्न । स्वामी सुप्रसन्न होत असे ॥६॥होत असे देव संतुष्ट भजतां । मुक्ति सायुज्यता तेणे लाभे ॥७॥लाभे नवविधा तेणे चुके चतुर्विधा । पुसावे सुबुद्धां सज्जनांसी ॥८॥सज्जनांसी पुसा देहासी भजतां । भार भगवंता कैसा पडे ॥९॥कैसा पडे भार देहाच्या भजने । भक्तिचेनि गुणे देव पावे ॥१०॥देव पावतसे भजतां देवासी । सेवितां देहासी देव कैंचा ॥११॥देव कैंचा देव सेविल्यावांचोनी । तत्त्वविवंचनी दास म्हणे ॥१२॥५८८.लोभा नवसांचा तो देव बद्धांचा । आणि मुमुक्षांचा गुरु देव ॥१॥गुरु देव जाण तया मुमुक्षांचा । देव साधकांचा निरंजन ॥२॥निरंजन देव साधकांचे मनी । सिध्द समाधानी देवरुप ॥३॥देवरुप जाला संदेह तुटला । तोचि एक भला भूमंडळी ॥४॥भूमंडळी रामदास्य धन्य आहे । अनन्यता पाहे शोधूनियां ॥५॥५८९.राम कैसा आहे हे आधी पहावे । मग सुखेनावे दास्य करुं ॥१॥दास्य करुं जन देव वोळखेना । जाले ब्रह्मज्ञान दास्य कैसे ॥२॥दास्य कैचे घडी देवासी नेणतां । वाउगे शिणतां श्रम उरे ॥३॥श्रम उरे साध्य ते कांही दिसेना । अंतरी वसेना समाधान ॥४॥समाधान देव पाहतां घडेल । येर विघडेल दास म्हणे ॥५॥५९०.जो जो भजनासी लागला । तो तो रामदास झाला ॥१॥दासपण रामी वाव । रामपणा कैंचा ठाव ॥२॥आदिकरुनि तिन्ही देव । सकळ आहे भक्तिभाव ॥३॥रामी राम तोहि दास । भेद नाही त्या आम्हांस ॥४॥रामदास्यकरुनि पाहे । सर्व सृष्टि चालताहे ॥५॥प्राणिमात्र रामदास । रामदासी हा विश्वास ॥६॥५९१.दिनानाथाचे सेवक । आम्ही स्वामींहुनी अधिक ॥१॥शरणांगत राघवाचे । परी शरण दारिद्राचे ॥२॥जे जे देवासे दुःसह । ते ते आम्हां सुखावह ॥३॥रामीरामदास म्हणे । रामकृपेचेनि गुणे ॥४॥५९२.दासाची संपत्ति राम सीतापति । जीवाचा सांगाती राम एक ॥१॥राम एक माता राम एक पिता । राम सर्व भ्राता सहोदरु ॥२॥सहोदरु विद्या वैभव कांचन । सर्वही स्वजन राम एक ॥३॥राम एक स्वामी रामचि कैवारी । लाभ तो संसारी राम एक ॥४॥राम एक ज्ञान राम एक ध्यान । रामे समाधान रामदासी ॥५॥५९३.ब्रीद साच केले भक्तां उद्धरीले । प्रचितीस आले मनाचिये ॥१॥मनाची प्रचिती जाली निर्वासना । लेशहि असेना विषयांचा ॥२॥विषयांचा लेश संसारदायक । जानकीनायक चुकवितो ॥३॥चुकवितो जन्ममृत्यु सेवकांचा । विचार हा काचा कदा नव्हे ॥४॥कदा नव्हे कांही वाक्य अप्रमाण । धरावे चरण राघवाचे ॥५॥राघवाचे दास सर्वस्वे उदास । तोडी आशापाश देवराणा ॥६॥देवराणा भाग्ये जालियां कैपक्षी । नाना परी रक्षी सेवकासी ॥७॥सेवकासी कांही नलगे साधन । करीतो पावन ब्रीदासाठी ॥८॥ब्रीदासाठी भक्त तारिले अपार । आतां वारंवार किती सांगो ॥९॥किती सांगो देव पतितपावन । करावे भजन दास म्हणे ॥१०॥५९४.रानी वनी मनी राम असो द्यावी । करील कुडावा सेवकांचा ॥१॥सेवकांचा भार घेतसे साचार । म्हणोनी अंतर पडो नेदी ॥२॥पडो नेदी शब्द माझा भूमिवरी । दृढ चित्ती धरी देवराणा ॥३॥देवराणा सर्वां देवां सोडविता । लागईल चिंता त्यासी तुझी ॥४॥तुझी चिंता करी राव आयोध्येचा । कृपाळु दीनांचा दास म्हणे ॥५॥५९५.कायावाचामने यथार्थ रामी मिळणे । तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य ॥१॥कामक्रोध खंडणे मदमत्सर दंडणे । तरी० ॥२॥परस्त्रीनपुंसक होणे परद्रव्ये पोळणे । तरी० ॥३॥जैसे मुखे बोलणे तैसी क्रिया चालणे ॥ तरी० ॥४॥मायानिवर्तक ज्ञाने ज्ञेयचि पै होणे । तरी० ॥५॥रामदास म्हणे निर्गुण सुख लाधणे । तरी० ॥६॥५९६.आमुचे वंशी आत्माराम । एका पिंडीचे निष्काम ॥१॥रामदास्य आले हाता । अवघा वंश धन्य आतां ॥२॥बापे केली उपार्जना । आम्ही लाधलो त्या धना ॥३॥बंधु अभिलाषा टेकला । वांटा घेऊनि भिन्न जाला ॥४॥पोर सकळां संकोचले । एकट सुखी उधळले ॥५॥रामीरामदासे स्थिति । पाहिली वडिलांची रीति ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP