मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पाळणा

देवताविषयक पदे - पाळणा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


१०५६.
( राग-काफी; ताल-दादरा )
उदार रामचंद्र हा वदावा किती ॥ध्रु०॥
येतां अनन्य शरण बिभिषणा शीघ्र करी ।
चिरंजीव लंकापती ॥१॥
उत्तानचरण बाळ होत शरण तया देत ।
अढळ अक्षयी संपत्ती ॥२॥
चिन्मयानंद भाग्य रामदासासि सहज ।
वोळला जानकीपति ॥३॥

१०५७.
बोले मंदोदरी रावण ऐकतो काळ कठीण दिसतो ।
दिवसंदिवस शोकसंताप वाढतो ॥ काळ० ॥
गेला दिअस तो मागुता कैसा येतो । काळ कठिण० ॥
पाहो जातां विचार तकवा तुटतो । काळ० ॥ध्रु०॥
उदास वाटते बहु दुश्चिन्हे दिसती कैसी आली काळगती ।
पडती नक्षत्रां पात होती । कैसी आली काळगती ।
नगरामध्ये रमा करीतसे रुदंती । कैसी० ॥
रक्तबुंद पडती भूकंप होताती । कैसी० ॥१॥
सिंधु वोलांडुनि सैन्य आले येथे । पुढे विपरीत दिसते ।
महावीर पडती वानरांच्या हाते । पुढे० ॥
ससे उठोनि बळे सिंहाला त्रासिते । पुढे० ॥
घडेना ते कैसे अघटित घडते । पुढे० ॥२॥
गांवलोक सदा घरकल्हो करिती । कैसी० ॥३॥
स्वप्नामध्ये काळसर्प डंखो येतो । जीव कासावीस होतो ॥
मुलास बाइको पुरुषास पुरुष खातो । जीव० ॥
नाना प्रकारींचा प्रळय वाटतो । जीव० ॥
सीता देऊन राम करा आपुला तो । जीव० ॥४॥

१०५८.
अरे अरे रावणा तो राम आला रे ।
जनकजा आणिली तेणे तो क्षोभला रे ।
निशाचर कुळाचा क्षयो मांडला रे ।
रामे युद्ध केलिया मग जाणवेल तुजला रे ॥ध्रु०॥
देवा आणि दानवा वाळी आवरेना रे ।
बंधुजया अभिळासी दोष विचारीना रे ।
तरुवर बिकट ज्याचे त्यास मारवेना रे ।
ऐसा तोही मारिला तुज कां कळेनारे ॥१॥
गोळांगुळांसहित सिंधुतीरा आला रे ।
बिभिषण जाऊन शरण रिघाला रे ।
जाणोनियां अंतर त्याचे रामे आपंगिला रे ।
लागवेग करुनियां सिंधू पालाणिला रे ॥२॥
भूमंडळ व्यापिले परचक्र आले रे ।
धुशर दाटले दळ खवळले रे ।
हुडा हुडा गर्जती गगन भेदिले रे ।
रामासी कां विरोध रामे काय केले रे ॥३॥
वैभव देखोनियां रावण भुलला रे ।
त्रिदश देवांचा बंद धरिला रे ।
सिकविले नायकेचि दैत्य मातला रे ।
रामदासदातारे सूड घेतला रे ॥४॥

१०५९.
थाटे चालिली राक्षसांची रे राक्षसांची रे ।
दळे उठिली वानरांची रे ॥१॥
दोही दळींचे एक जाले रे जाले रे ।
काळ महाकाळ ते मिळाले रे ॥२॥
हत्तीवरील हतनालारे नाला रे ।
तोलती ढोल ती राजढाला रे ॥३॥
फौजा उठिल्या राउतांच्यारे राउतांच्या० ।
दाटी जाहल्या रथांच्यारे ॥४॥

१०६०.
हुले कपाळ ज्यांचे घुले पाहाणे त्यांचे ।
फुटाणे आणि चण्याचे आरत बहू ॥ध्रु०॥
वांकुल्या दाविती । कुंसी कांडोळिती ।
उड्डाणे घेतां लोंबती । लांगुळे लांबे ॥१॥
मऊ किरकोळ बोटे । लांबे नखे तिखटे ।
खोउनी फोडिती पोटे । निशाचरांची ॥१॥
संकोचित बैसणे । पाला वरपोनी खाणे ।
तांतडी चावितां तेणे । हनुवटी हाले ॥३॥
कुळ हनुमंताचे । मोठे किराण त्यांचे ।
भुभुकारे जयाचे । किलकिलाटे ॥४॥
आतां वाटते जावे । त्याचे सांगाती व्हावे ।
डोळे भरुनी पाहावे । सर्वांग त्यांचे ॥५॥
ऐकोनी हांसाल परी । नये तयांची सरी ।
विचार जयांसी करी । स्वामी माझा ॥६॥
असंख्य मिळाला मेळा । रामा भोंवता पाळा ।
पालथे या भूगोळा । घालूं शकती ॥७॥
ऐसी करणी त्यांची । व्यर्थ जिणी आमुची ।
पाला खाउनी । रामाची शुश्रूषा केली ॥८॥
ऐसे ते रामदास । सर्वस्वे उदास रामी जयांचा विश्वास ।
बाणोनि गेला ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP