देवताविषयक पदे - विठ्ठल
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
११४६.
( राग बिहाग; ताल-धुमाळी )
विठाई सांवळे डोळसे रंगा येई वो ॥ध्रु०॥
जो कां नित्य निर्विकार, ज्याचा वेदां न कळे पार तोचि जाहलासे साकार,
स्थान पंढरीचे ज्याचे ॥१॥
ब्रह्म चैतन्य केवळ, जो का आनंदाचे मूळ, जेणे विश्व हे सकळ,
इच्छामात्रे निर्मिले ॥२॥
म्हणे रामीरामदास, त्याचा धरितां निजध्यास,
तोडी जन्ममृत्युपाश, स्वपदालागी पाववी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2011
TOP