मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| उपदेशपर विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - उपदेशपर श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ उपदेशपर Translation - भाषांतर ६२१.धान्य अवघेंचि टाकिती । बळथ खातां तोंडी माती ॥१॥देव सर्वांचे अंतरी । सोडूं जातां तैसा परी ॥२॥तूप सांडोनी आपण । खाऊं पाहे सांठवण ॥३॥रामदास म्हणे राउळा । सांडुनि पूजिती देउळा ॥४॥६२२.कांही दिसे अकस्मात । तेथे आले वाटे भूत ॥१॥वायां पडावे संदेही । मुळी तेथे कांही नाही ॥२॥पुढे देखतां अंधार । तेथे आला वाटे भार ॥३॥झाडझुडूप देखिले । तेथे वाटे कोणी आले ॥४॥पुढे रोविलासे डांभा । त्यासी म्हणे कोण उभा ॥५॥रामदास सांगे खूण । भितो आपणा आपण ॥६॥६२३.छाया देखूनी आपुली । शंका अंतरी वाटली ॥१॥ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणा आपण ॥ध्रु०॥मुखे बोलतां उत्तर । तेथे जाले प्रत्युत्तर ॥२॥डोळां घालितां अंगुळी । एकाची ते दोन जाली ॥३॥पोटी आपण कल्पिले । तेंचि आलेसे वाटले ॥४॥दास म्हणे रे उपाधी । शंका धरितां अधिक बाधी ॥५॥६२४.वाजे पाऊल आपुले । म्हणे मागे कोण आले ॥१॥कोण धांवतसे आड । पाहो जातां जाले झाड ॥२॥भावितसे अभ्यंतरी । कोण चाले बरोबरी ॥३॥शब्दपडसाद ऊठिला । म्हणे कोण रे बोलिला ॥४॥रामीरामदास म्हणे । ऐसी शंकेची लक्षणे ॥५॥६२५.वड पिंपळ वाढले । बहुसाल विस्तारले ॥१॥परि ते जाणावे निर्फळ । त्याचे खातां नये फळ ॥ध्रु०॥नाना वृक्ष फळेविण । परि ते जाणा निःकारण ॥२॥दास म्हणे रे विचार । नसतां तैसे होती नर ॥३॥६२६.नेला संसारे अभ्यास । केला आयुष्याचा नाश ॥१॥सदा उठतां बैसतां । लाभेंविण केली चिंता ॥२॥नाही साक्षेपाच वेग । उगेचि मांडिले उद्वेग ॥३॥रामीरामदास म्हणे । ऐसे जीतचि मरणे ॥४॥६२७.तीस लक्ष योनि वृक्षामाजी घ्यावा । जळचरी भोगाव्या नव लक्ष ॥१॥अकरा लक्ष योनि किड्यांमाजी घ्याव्या । दश लक्ष भोगाव्या पक्ष्यांमाजी ॥२॥वीस लक्ष योनी पशूंचिया घरी । मानवाभीतरी चारी लक्ष ॥३॥एक एक योनी कोटि कोटि फेरा । मनुष्याचा वारा लागेंचिना ॥४॥दास म्हणे तया संसारिया नरा । तयाचा मातेरा केला मूढे ॥५॥६२८.कांही कळेना विचार । अवघा जाला शून्याकार ॥१॥उमजेना संसारिक । आठवेना परलोक ॥२॥अंध विवरी पडले । अंधकारी सांपडले ॥३॥मायजाळे गुंडाळले । वासनेने वेंटाळले ॥४॥कामक्रोधे जाजावले । मदे मत्सरे पीडिले ॥५॥रामीरामदास म्हणे । अज्ञानाची ही लक्षणे ॥६॥६२९.अंध अंधारी बैसले । त्यासि हाते खुणाविले ॥१॥त्यास कळेना कळेना । त्याचि वृत्तिच वळेना ॥२॥संतसंगाचे बोलणे । संसारिक काय जाणे ॥३॥म्हणे रामीरामदास । केला नसतां अभ्यास ॥४॥६३०.मूर्ख तो संसारी माझे माझे करी । मृत्यु बरोबरी हिंडतसे ॥१॥हिंडतसे काळ सांगाती सरिसा । मनी भरंवसा नेणोनियां ॥२॥नेणोनियां प्राणी संसारासी आला । आला तैसा गेला दैन्यवाणा ॥३॥दैन्यवाणा गेला सर्वही सांडोनी । ठेविले जोडुनी जनालागी ॥४॥लागी हे लागली दोषांची सुटेना । अभक्ति तुटेना अंतरीची ॥५॥अंतरीची मूर्ति अंतरली दुरी । कदाकाळी हरि आठवेना ॥६॥आठवेना अंतकाळी रामेवीण । धन्य ते मरण दास म्हणे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP