मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
गुरुपरंपरा

विविध विषय - गुरुपरंपरा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२७० .

आदिनारायण सद्गुरु आमुचा । शिष्य हो तयाचा महाविष्णु ॥१॥

तयाचा हो शिष्य जाणावा तो हंस । तेणे ब्रह्मयास उपदेशिले ॥२॥

ब्रह्मदेवे केला उपदेश वशिष्ठा । तेथे धरिली निष्ठा शुद्ध भाव ॥३॥

वशिष्ठ उपदेशी श्रीरामरायासी । श्रीरामे दासासी उपदेशिले ॥४॥

उपदेश देऊन मजला मारुती । स्वये रघुपती निरवीला ॥५॥

निरवितां तेणे जालो रामदास । संसारी उदास जीवेभावे ॥६॥

म्हणोनि आमुचे कुळी कुळदैवत । राम हनुमंत आत्मरुपी ॥७॥

आत्मरुपी जाला रामीरामदास । केला उपदेश दीनोद्धारे ॥८॥

२७१ .

भाविका भजन गुरुपरंपरा । सदा जप करा राममंत्र ॥१॥

राममंत्र जाणा त्रयोदश मात्रा । सर्व वेदशास्त्रां प्रगटचि ॥२॥

प्रगटचि राममंत्र हा प्रसिद्ध । तारीतसे बद्ध जडजीवां ॥३॥

जडजीवां तारी सकळ चराचरी । देह काशीपुरी धन्य जेणे ॥४॥

मंत्र हा तारक ओंकार स्वरुप । देत विश्वरुप मुमुक्षांसी ॥५॥

येणे मंत्रे जाणा मुमुक्षु सावध । साधक प्रसिद्ध सिध्द होय ॥६॥

सिध्द होय रामतारक जपतां । मुक्ति सायुज्यता रामदासी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP