मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| श्रीकृष्ण विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - श्रीकृष्ण श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ श्रीकृष्ण Translation - भाषांतर ११२४.( चाल-साधुसंतां मागणे० )परब्रह्म अवतार भूमिवरी । प्रगटला हा गौळियाचे घरी ॥१॥कृष्णरुपे धरिले कृष्णनाम । गोपीगोपाळाचे पूर्ण करी काम ॥२॥देवां रक्षुनि दानवां उद्धरील । ऐसे जातक सांगती ऋषिकुळ ॥३॥व्यास नारद आदरे ज्यासि गाती । त्याची खांदी कांबळी काठी हाती ॥४॥शशिसूर्यसम कांति ज्याची कळा । त्यासी म्हणती सांवळा आणि काळा ॥५॥गोविंदाची कृपा जाली आतां । दास म्हणे गोविंदगुण गातां ॥६॥११२५.( चाल-धर्म जागो० )माभळभट्टा पिढेदान । देतो भगवंत आपण । निंदा द्वेष कामा नये । तेणे होतसे कठिण ॥ध्रु०॥गोकुळींचा पुरोहितु । गोंवळ्या सांगतो हितु । बाळकु कुळासी घातु । याचा करा निःपातु ॥१॥सर्वांसि लविला वेधु । त्याचा मानिला खेदु । स्वार्थमूळ पोटासाठी ।केला देवासी विरोधु ॥२॥पराधिक सोसवेना । चाळे करिते कल्पना । कुष्टपुष्ट उणे पुरे ।दास म्हणे हे मानेना ॥३॥११२६. ( चाल-धर्म जागो० )नंदाचे मूल काळे । त्यासी नेले काळे । कोणीएक काळे । चालले उफाळे ॥ध्रु०॥कां करिसी धिटाई । कां करिसी खोटाई । कां करिसी चाटाई । जगदीशाचे ठायी ॥१॥नंदाचा खिल्लारी । नेतो सुंदर नारी । अखंड घरोघरी । करितो रसचोरी ॥२॥न कळे त्याची लीळा । करणे ते अवलीळा ।सकळांहूनि वेगळा । कोण जाणे कळा ॥३॥न कळे कैसा भोगी । न कळे कैसा त्यागी ।दास म्हणे वीतरागी । कुळासी जाला योगी ॥४॥११२७.( राग-कल्याण; ताल-त्रिताल; चाल-अरे नर सार० )तांडवनृत्य करी, देवाधिदेव ॥ध्रु०॥थैया थैया धमक जातसे । सरी न दिसे दुसरी ॥१॥नटनाट्यकळा सकळ जाणे । चाकाटल्या किन्नरी ॥२॥गीतनृत्यवाद्यघनस्वरादिक । दास म्हणे विवरी ॥३॥११२८.( चाल-निरुपम रामाबाई० )गोपाळ सांवळी उभी कदंबवृक्षातळी वो । परब्रह्म पुतळी भाग्ये अवतरली गोकुळी वो ॥ध्रु०॥स्वानंदमयमुनातटी बोधद्रुमाचे तळवटी वो ।जगदीश नरनटी उभी येक पदाचे नेटी वो ।द्वितीय पद उफराटी स्पर्शूनियां अगुष्ठी वो ।त्वं पद तत्पर कर कटी वो । कांखे खोउनी तत्वकाठी वो ॥१॥चिद अतसी कुसुम त्याहुनी तनुतेज सुशाम वो ।अति सकुमारपणे शब्द कठीण वाटे व्योम वो ।पूर्णानंदसरोजी वरील तैसे ते मुखपद्म वो । गोपीनयन मधुकर जेथे पावती निज विश्राम वो ॥२॥वेणु वाहे मधुकर शब्देवीण गाय अक्षर वो । कोंदले अंबर खेचर जाले तदाकार वो । समग्र धरणीधर तृण समीर तरुवर वो ।रामीरामदासी तन्मय जाले सचराचर वो ॥३॥११२९. ( चाल-साधुसंतां मागणे० )हरिपदपंकजी मानस मधुकरे । विसांवा गर्जतसे झुंकारे ॥ध्रु०॥गाई चारितसे यमुनेपाभळी । वेणु वाजवी सुरस वनमाळी ।जळे थोकली यमुना तयेकाळी । व्रजनायका पीटिती करताळी ॥१॥उभा देहुडा पाउली जगजेठी । आंगी बाणली वो चंदनाची उटी ।बाहुभूषणे हो केयूराची थाटी । कांखे टेकुनियां सुंदर वेताटी ॥२॥वेणु वाजवितो सर्वांगे सुंदरु । कांसे कांसिला रुळतो पीतांबरु ।वांकी चरणी हो ब्रीदांचा तोडरु । रामदासाचा स्वामी मनोहरु ॥३॥११३०.( राग-कल्याण; ताल-त्रिताल )हरिवीण काय रे उद्धवा ॥ध्रु०॥ज्ञान न माने ध्यान न माने । आणीक व्यर्थ उपाय ॥१॥नित्य निरंजन ध्याती मुनिजन । मानस तेथे न जाय ॥२॥निर्गुण ते खुण अंतर जाणे । दास गुणगण गाय ॥३॥११३१.( राग-केदार; ताल-त्रिताल )कईं येईल हरि रे उद्धवा ॥ध्रु०॥अशन शयन भाषण न मने । यदुविर गेला बहुत दुरि रे ॥१॥रात्रिंदिवस निजध्यास मनाचा । सौख्य कळा न दिसे दुसरी रे ॥२॥यदुकुळटिळक प्राण आमुचा । दास म्हणे आतां कोणेपरी रे ॥३॥११३२.( राग-कानडा; ताल-दादरा )समजत वेधिले मना । धन्य धन्य मोहना ॥ध्रु०॥दिसत भासे रम्य विळासे । अगणित गुण गणना ॥१॥चमकत चित्त चकित चि जाले । लीन तल्लीन निवाले ॥२॥अंतरिचा हरि अंतरल्यावरि । मग काय भूषण ॥३॥त्याविण हा जीव जाइल माझा । दास म्हणे मरणे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP