मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| अध्यात्म विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - अध्यात्म श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ अध्यात्म Translation - भाषांतर ८५१.नमूं वेदमाता नमूं त्या अनंता । प्रश्न सांगो आतां श्रोतयांचे ॥१॥श्रोतयांचे प्रश्न जीव हा अज्ञान । जया सर्व ज्ञान तोचि शिव ॥२॥शिवपर आत्मा त्यापर परमात्मा । बोलिजे अनात्मा अनिर्वाच्य ॥३॥वाच्य हा प्रपंच माईक जाणावा । घडामोडी देवापासुनीयां ॥४॥विषय अविद्या त्यागावी ते विद्या । निर्विकल्प आद्याचे स्वरुप ॥५॥कल्पना हे माया तत्त्व मूळमाया । यासी चाळावया चैतन्यचि ॥६॥नकार ते शून्य व्यापक चैतन्य । ईश्वर अनन्य समाधान ॥७॥जीव हा जन्मला जीवा मृत्यु आला । बद्ध मुक्त जाला तोचि जीव ॥८॥ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता । मोक्ष हा तत्त्वतां ईश्वरचि ॥९॥ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण । हेचि ब्रह्मखूण दास म्हणे ॥१०॥दास म्हणे सर्व मायेचे करणे । मिथ्यारुप जाणे अनुभवी ॥११॥८५२.उपदेशपद्धती आतां सांगईन । होई सावधान आलया रे ॥१॥आलया रे सांग तूं कोण आहेसी । वेगी आपणासी ठायी पाडी ॥२॥ठायी पाडी तुज तूंचि चुकलासी । देहाचा धरिसी अभिमान ॥३॥अभिमान देही कोण्या अवेवाचा । पांचा पंचकांचा स्थूळ देह ॥४॥स्थूळ देह दृश्य यांचा तूं जाणता । देह मी म्हणतां जीवदशा ॥५॥जीवदशा गेली साक्षत्वे वर्ततां । ईश्वरु तत्त्वतां याचे नांव ॥६॥नांव रुप देही साक्षी तो विदेही । या विवेके नाही देहबुद्धि ॥७॥देहबुद्धि गेली या स्थूळ देहाची । उरी संदेहाची लिंगदेह ॥८॥लिंग देही मन वासनेची वृत्ती । होतसे निवृत्ती साक्षरुपे ॥९॥साक्षरुपे पांच पंचके राहिली । जाणोनि सांडिली कर्णादिके ॥१०॥कर्ण प्राण आणि विषयपंचक । इंद्रियदशके पंचवीस ॥११॥पंचवीस तत्त्वे या लिंगदेहाची । साक्षी वेगळाचि अनुभवे ॥१२॥अनुभवे साक्षी स्थूळ सुक्ष्माचा । जागृती स्वप्नाचा जाणतां तूं ॥१३॥जाणतां तूं कोण सांग ओळखण । नेणे मी आपण आपणासी ॥१४॥आपणासी नेणे स्वामीने सांगावे । अज्ञान जाणावे रुप तुझे ॥१५॥तुझे तूंचि बारे नेणे म्हणतोसी । तेंचि निश्चयेसी रुप तुझे ॥१६॥तुझे रुप तुज दृश्य होत आहे । नेणपण पाहे साक्षरुप ॥१७॥साक्षरुप मज कळेना म्हणसी । तो तूं निश्चयेसी वेगळाचि ॥१८॥वेगळाचि तिही देहा विलक्षण । वर्ततो आपण साक्षरुपे ॥१९॥साक्षरुप सर्व पदार्थ जाणता । तो कांही तत्त्वतां आत्मा नव्हे ॥२०॥आत्मा नव्हे जाण जाणे अंतःकर्ण । नाही जाणपण आत्मरुपी ॥२१॥आत्मरुप मनबुद्धिअगोचर । आठव विसर जेथे नाही ॥२२॥जेथे नाही वृत्ति सर्वहि निवृत्ती । जाणती नेणती वृत्ति बापा ॥२३॥वृत्तिरुप आत्मा हे कई घडावे । तेव्हां विघडावे निवृत्तीसी ॥२४॥निवृत्ति उन्मनी निःशब्द विज्ञान । ऐसे समाधान अनिर्वाच्य ॥२५॥अनिर्वाच्य तेथे नाही जाणपण । आपुले आपण पुरातन ॥२६॥पुरातन एक प्रपंच माईक । मिथ्याचि अनेक भास मात्र ॥२७॥भासमात्र कांही नसोनियां आहे । विचारुनि पाहे अनुभवे ॥२८॥अनुभवेवीण उठे जाणपण । जाणपणे सीण वाउगाचि ॥२९॥वाउगाचि शीण करीतसे मन । आत्मा ज्ञानघन म्हणोनीयां ॥३०॥म्हणोनियां मुळी अज्ञानाची नाही । तेथे ज्ञान काईं वाउगेचि ॥३१॥वाउगेंचि ज्ञान मनाची कल्पना । निर्विकल्प जाणा कल्पूं पाहे ॥३२॥कल्पूं पहे मन कल्पनाविषय । तरी आत्मा काय विषयांऐसा ॥३३॥ऐसा नव्हे आत्मा मनासी नाकळे । मनचि मावळे पाहो जातां ॥३४॥पाहो जातां त्यासी क्षयो पाहत्यासी । म्हणोनि मनासी अगोचर ॥३५॥अगोचर मना ते कैसे पाहावे । मीपणासी ठावे कदां नव्हे ॥३६॥नव्हे जाणीजेसे ऐसेचि जाणावे । मग होय ठावे समाधान ॥३७॥समाधान ते तूं वाक्य तत्त्वमसि । सोहंहंसा ऐसी मात आहे ॥३८॥पाहे अहं ब्रह्म ऐसेचि वचन । ब्रह्मसनातन तूंचि बापा ॥३९॥तूंचि येक ब्रह्म येर सर्व भ्रम । दृढ धरी वर्म अंतरीचे ॥४०॥अंतरीचे वर्म अंतरी धरावे । विचारे करावे दृढोत्तर ॥४१॥दृढोत्तर होय श्रवणमनने । अद्वैतचि मने विवरावे ॥४२॥विवरावे जरी भक्तीचे लक्षण । वैराग्य ते कोण कैसे आहे ॥४३॥आहे भक्ति ऐसी विवेके जाणावी । आवडी धरावी शाश्वताची ॥४४॥शाश्वताची प्रीति विषयी विरक्ति । नाशिवंत चित्ती जाणोनियां ॥४५॥जाणोनियां सर्व नाशिवंत ऐसे । शाश्वती विश्वासे मन बुद्धि ॥४६॥बुद्धीचा निश्चयो स्वरुप जाहाला । विश्वासला सस्वरुपी ॥४७॥स्वरुपी आसक्ति याचे नांव भक्ति । पाहातां विभक्ति जेथे नाही ॥४८॥जेथे नाही देहबुद्धीचे अज्ञान । तया नांव ज्ञान बोलिजेते ॥४९॥बोलिजेते ज्ञान सर्वसाक्षभूत । जाणावे अद्वैत तेंचि ज्ञान ॥५०॥ज्ञान आणि भक्ति येकचि असती । वैराग्याची स्थिती बोलिजेल ॥५१॥बोलिजे वैराग्य त्यागाचे लक्षण । साक्षी विलक्षण जाणोनियां ॥५२॥जाणोनी माईक सर्वहि त्यागिले । मन सुखावले संगत्यागे ॥५३॥संगत्याग केला निःसंग राहिला । सर्वहि एकला एकरुप ॥५४॥एकरुप जाले भक्ति आणि ज्ञान । वैराग्यहि जाण एकरुप ॥५५॥एकरुप जाले भक्ति आणि ज्ञान । बुडाले साधन वैराग्याचे ॥५६॥वैराग्यावाचूनि सर्व खंडे ज्ञान । त्यागाचे लक्षण तेथे नाही ॥५७॥नाही भक्तिभाव सगुणाच्या ठायी । शब्दज्ञान काईं बोलोनियां ॥५८॥बोलोनियां मुखे तैसी क्रिया करी । धन्य तो संसारी ब्रह्मज्ञानी ॥५९॥ब्रह्मज्ञानी भला वर्तुणुकेपासी । कोरड्या शब्दासी कोण पुसे ॥६०॥कोण पुसे बापा ज्ञान हे शाब्दिक । क्रिया अलोलीक सत्य जाणा ॥६१॥सत्य जाण भक्ति शरीरे करावी । आवडी धरावी सगुणाची ॥६२॥सगुणी आदरे देह झीजवावे । भजन करावे नवविधा ॥६३॥नवविधा खूण श्रवण कीर्तन । नामाचे स्मरण सर्वकाळ ॥६४॥सर्वांचे जीवन ते पादसेवन । करावे पूजन यथासांग ॥६५॥यथासांग पूजा देवाब्राह्मणांची । प्रीती वंदनाची सर्वकाळ ॥६६॥सर्वकाळ दास्य मानसी आवडे । सख्यचि रोकडे सर्वांभूती ॥६७॥सर्वांभूतीए मन आत्मनिवेदन । ऐसे हे भजन ॥६८॥नवविधा भक्ति हा देह चालतां । करावी सर्वथा सर्व भावे ॥६९॥सर्वभावे सदा सगुणी भजावे । कोरडे त्यागावे शब्दज्ञान ॥७०॥शब्दज्ञान भक्ति संसारी आसक्ती । त्या नांव विभक्ति सत्य जाण ॥७१॥सत्य जाण मने आधार घेतला । सुखे सुखावला विषयांच्या ॥७२॥विषयांचे सुख चोरुनि अंतरी । त्याग दुराचारी उच्छेदी तो ॥७३॥उच्छेदिती आहे भक्ति सगुणाची । वाट साधनाची मोडतसे ॥७४॥मोडतो आचार कर्म कुळाचार । करी भ्रष्टाकार पापारुपी ॥७५॥पापरुपी नर जाणावा साचार । करी एकंकार शब्दज्ञाने ॥७६॥शब्दज्ञान गाथा अहंतेच्या माथां । तेणे तो सर्वथा आवरेना ॥७७॥आवरेना तोंडी धरितां पाषांडी । वेदज्ञाहि मोडी आंगबळे ॥७८॥तोंडबळे बापा क्रिया न संडावी । आसक्ति दंडावी वीतरागे ॥७९॥वीतरागे मन मोकळे करावे । सुख न धरावे संसाराचे ॥८०॥संसारीचे सुख नासिवंत आहे । जाईजणे पाहे विचारुनी ॥८१॥विचारुनि पाही आसक्ति मनाची । दुर्दशा ज्ञानाची करुं नको ॥८२॥करुं नये मुक्तक्रियेचा निश्चयो । तेणे होतो क्षयो साधनाचा ॥८३॥साधन सोडितां सिद्धपण गेले । साधनेसी भले सिद्धपण ॥८४॥सिद्धपण आंगी आदळो नेदावे । जाणपण द्यावे सोडुनियां ॥८५॥सोडूनी जाणीव जाणोनि नेणता । सिद्धपणे स्वतां साधक तो ॥८६॥साधक तो आहे ब्रह्मा विष्णु हर । साधनी तत्पर सर्वकाळ ॥८७॥सर्वकाळ त्याग करुनि उदास । योगिये तापस दिगंबर ॥८८॥दीगंबर हर साधनी तत्पर । त्याहूनि थोर जीव काय ॥८९॥काय ते चुकले उदासीन जाले । त्याहूनि हे भले जीव शब्दज्ञानी ॥९०॥शब्दज्ञानी भला तोचि तो जाणावा । स्वये पालटावा जालेपण ॥९१॥जालेपण भावे भजावे सगुणा । भक्ति उपासना जप ध्यान ॥९२॥जप ध्यान मन भोगी उदासीन । स्वधर्मरक्षण यथाशक्ति ॥९३॥शक्तिहूनी वाड ज्ञान बोलो नये । सांडूं नये सोय सगुणाची ॥९४॥सगुणाची सोय सांडूं नये कदा । तीर्थक्षेत्रे सदा आवडावी ॥९५॥आवडावे सदा स्वये निरुपण । श्रवण मनन निजध्यास ॥९६॥निजध्यासे होय अंतरीचा त्याग । बाह्य वीतराग उदासीन ॥९७॥उदासीन वृत्ति कोठे गुंडाळेना । उपाधी जडेना बाह्याकारी ॥९८॥बाह्य अभ्यांतरी त्याग निरंतरी । वैराग्य यापरी आचरावे ॥९९॥आचरावे कर्म ज्याचा जो स्वधर्म । आणि नित्यनेम साधनाचा ॥१००॥साधनाची वाट ओस पाडूं नये । बोलावी हे सोय निरुपणी ॥११०॥निरुपणी सत्य तेंचि प्रतिष्ठावे । मग आचरावे यथाशक्ति ॥१०२॥शक्तिसार स्वये जैसा आचरतो । तेंचि प्रतिष्ठितो मूढ जन ॥१०३॥मूढ जन तरे साधनी लागतां । पाविजे अनंता भक्तिपंथे ॥१०४॥भक्तिपंथे जातां होय सायोज्यता । निश्चयो तत्त्वतां दास म्हणे ॥१०५॥ N/A References : N/A Last Updated : January 29, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP