मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
बीर

भारूड - बीर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९६९.
हनुमंत जब जनकदुहिताके शुद्धि लीनकू गगनगर्भ दौरे तव कंठ गुर्गुर्गुर्गुर्गुर्गुरीत ।
नेत्र गर्गर्गर्गर्गर्गरीत । रोम थर्थर्थर्थर्थर्थरत । पुछ झारे ।
लंकानायक रावण घर्घर्घर्घर्घर्घरीत । वन दवर दवरत ।
सीताशोक हरत सुख करत । बन झर्झर्झर्झर्झर्झरीत तब उखारे ।
तब कटक खोच खोच खोच खोचित । इंद्रजीत करी नगर ज्यारे ।
ज्वाला झक्मक झमक झक्मकीत हेमलंक लखलखीत जय दास मिले
तब कपी भुबभुबभुबभुब पुकारे ॥१॥
हाक फुटली तडक समरंगणी धडक भाट बोलती कडक धडाडी होतसे ।
उठावले भारेभार आरंभला भडमार थोर मांडला संहार वीर वीर जातसे ।
मस्त हस्त किंकाटती घाला पताका डोलती रणी रथ घडघडिती काळ हस्त किंकाटती घाला
पताका डोलती रणी रथ घडघडिती काळ काळ खातसे ।
वाण सुटती सणाण भाली वाजती खणाण वीर पडती दणाण रक्तपूर वाहतसे ॥२॥
निशाचर बळकट दोही दळी केला कटकट जाला नीकट एक एकां झोडिती ।
शस्त्रे वोढिती भरार मिसळले भारेभार आरंभला भडमार हातपाय खोडिती ।
नानाध्वनी शंखध्वनी नाद भरला गगनी एकमेकां हटकुनी धडे शिरे फोडिती ।
रणी धरुनियां धीर वाहो लागले रुधीर कित्येक रणधीर पादपाणी खोडिती ॥३॥
घोडेस्वारांचे चळाळ नाना शस्त्रांचे झळाळ एकएकां जाले काळ परस्परे हाणिती ।
वीर तोडिती घसास शिरे फोडिती ठसास शूळ टोंचिती भसास आपशुद्धि नेणती ।
एक हांकिती पावले शस्त्रपाणी चौताळले एक एकांगे भांडले रणभूमि खाणती ।
वीरे वीर बुडाला अवघा हलकल्लोळ जाला महारुद्र खवळला ज्ञाते लोक जाणती ॥४॥
हरि गिरी परि ठाण बळे चालिले फूराण वरी घेतले किराण अंतराळ जातसे ।
कपी लागवेग धांवे मागे लांगूळ हेलावे वैरसंमंध आठवे वज्रदाढा खातसे ।
हरि गिरी परि ठाण बळे चालिले फूराण वरी घेतले किराण अंतराळ जातसे ।
कपी लागवेग धांवे मागे लांगूळ हेलावे वैरसंमंध आठवे वज्रदाढा खातसे ।
मनोवेगे झेंपावला द्रोणागिरीस पावला हात घाली औषधीला आटाघाटी होतसे ।
गिरी उत्पाटिला बळे सळे बांधला लांगूळे मागे फिरे अंतराळे लंकेवरी येतसे ॥५॥
निश्चळेना पळापळा अचपळ चि चपळ चळवळ चळवळ अंतराळ जातसे ।
झळकत झळ घनदामिनी पटळ कटकुपिन सरळ भुभुःकार देतसे ।
खळबळ खळबळ दैत्य पावले सबळ युद्ध मांडिले तुंबळ काळरुप होतसे ।
कपि निपट चि बाळ पुच्छी लागले भंबाळ ज्वाळ लोळचि कल्लोळ दैत्यकुळ जातसे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP