मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
फूल

भारूड - फूल

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९६३.
जीवनावांचूनि जाले । संकटी हातासि आले ।
हातीचे सुकोनि गेले । सुमन माझे ॥१॥
सकळ सृष्टीचे मूळ । तयाखाली आहे फळ ।
अत्यंत चांगले कोमळ । सुमन माझे ॥२॥
उदंड आहेति कळे । तयासारिखे न मिळे ।
सकळांपरिस आगळे । सुमन माझे ॥३॥
देखिले तोचि जाणे । येरां काय सांगणे ।
संग हा साहोंचि नेणे । सुमन माझे ॥४॥
रामीरामदास आस । सांडुनि फिरे उदास ।
सुमनाचा निजध्यास । तुटोनि गेला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP