मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
कोंडे

भारुडे - कोंडे

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९०६.
सत्ताविसी जे तेरावे । त्याचे श्रीमुख बरवे ॥१॥
पांचांअक्षरी उच्चार । त्यासी माझा नमस्कार ॥२॥
रत्नसंख्या अभ्यंतरी । सर्वकाळ त्या सुंदरी ॥३॥
इंद्रासनाचे आयन । रामदासे केले ध्यान ॥४॥

९०७.
प्लवंगमी आव्हारिले । जेणे तयासी निर्मिले ॥१॥
त्याच्या नामाऐसे करा । तेणे भवसिंधु तरा ॥२॥
दिनकर नाम जे ठेविले । पवनात्मजे सिद्ध केले ॥३॥
रामदास म्हणे भावे । सत्ताविसी जे तेविसावे ॥४॥

९०८.
बारामाजी एकादशी । जन्म जाहला तयासी ॥१॥
त्याचे नामी एकाक्षर । गाळोनियाम निरंतर ॥२॥
बाळ पिसे आणि मूर्ख । त्रिवर्गा परम सुख ॥३॥
रामीरामदास म्हणे । रायविनोदी बोलणे ॥४॥

९०९.
सप्तामाजी जो दुसरा । त्यासि होय एकोदरा ॥१॥
तिचा कांत गेला शाम । त्याचा धरा नित्यनेम ॥२॥
कलहप्रियाची भगिनी । त्याच्या पित्याची जननी ॥३॥
रामदास म्हणे कळी । माजी पूज्य भूमंडळी ॥४॥

९१०.
सार मुक्ताचा उगमू । तेथे ज्याचा पराक्रमू ॥१॥
चंद्र उपमा जयाचे । अर्ध रजनीचरभक्षाचे ॥ध्रु०॥
जे या आकाशासि नाही । तेथे उद्भवले सर्वही ॥२॥
तृप्त जाहली अष्टमा । त्यास जयाची उपमा ॥३॥
रामदास म्हने त्याचे । राम दोहींच्या नामाचे ॥४॥

९११.
साठींमाजी जो दशमू । त्याच्या पित्याचा जो आश्रमू ॥१॥
पित्या पुत्राच्या आश्रमा । गेल्या कोणाचा महिमा ॥२॥
भारामध्ये गेले मास । तितुकी आन ते जयास ॥३॥
म्हणे रामीरामदास । उभयतांचा एक अंश ॥४॥

९१२.
पांचांमध्ये जे पहिले । पहा तैंसेचि वहिले ॥१॥
तिही अक्षरी उच्चार । आहे चौघांचे ही सार ॥२॥
सातां जणांचे शेवटी । आठाकरितां होय भेटी ॥३॥
रामीरामदास म्हणे । नवांमाजी पहिल्या गुणे ॥४॥

९१३.
पहिल्या गुणे दुसरा पक्ष । तेणे लक्षावा अलक्ष ॥१॥
देव जवळी चूकला । भक्त भेदे भांबावला ॥२॥
पुढे सांपडतां धन । वायां करावे साधन ॥३॥
रामदास म्हणे सार । येथे पाहिजे विचार ॥४॥

९१४.
( पद. राग-कल्याण; ताल-धुमाळी ).
दास म्हणे रोकडे । सांग माझे कुवाडे । मनबुद्धिकानडे । ते काय गे बाइये ॥ध्रु०॥
महि नव्हे पावक । वायु नव्हे उदक । नभासहि व्यापक । ते काय० ॥१॥
स्थूळ लिंग कारण । तिहींस जे आगळे । प्रणवयावेगळे ते० ॥२॥
बहु घनदाट ते । नाही काळी वीटते । अखंडीत भेटते ॥३॥
जवळी ते न दिसे । तर्कासीहि न भासे । तेजेवीण प्रकाशे ॥४॥
सर्वां भूती कोंदले । सर्व गिळोनी राहिले ।
दासा रुप संचले । ते काय गे बाइये ॥५॥

९१५.
खेळा रे भाईंनो खेळा रे ॥ अंतराळी मन मेळा रे ॥ध्रु०॥
जळ नाही तेथे जाला प्रबळ ॥ तया वृक्षाचे मूळ चोजवेना ॥१॥
बीजेवीण अंकुर मुळेविण विस्तार ॥ फळेविण पडिभर दाटलेसे ॥२॥
धरितां मूळ सांपडे डाळ ॥ चुकले फळ त्या मुळाकडे ॥३॥
विस्तार तोडिला खेळचि मोडिला ॥ रामचि जोडिला रामदासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP