मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
वासुदेव

भारूड - वासुदेव

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९७४.
( राग-भैरव; ताल-धुमाळी )
ताळ दंडी चिपोळी वाजे घागरिया मधुर ध्वनी जे रे रे रे ॥ध्रु०॥
वासुदेव त्रैलोक्य चालवितो । अबोलणेंचि बोले बोलवितो ।
धन्य एकला सकळ करीतो रे० । गात वाजवितो नाचत रे ॥१॥
मुळी तंत तो एक मुळींचा । भेद अनेक बोलती वाचा ।
थोर तंतु त्या वासुदेवाचा । तेथे खुंटल्या त्या वेदवाचा रे ॥२॥
दास निश्चळी चंचळ एक । एक पाहतां ते एक बेक ।
सार शोधुनि घ्या नेमक । संतसज्जनाचा विवेक ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP