मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
कापडी

भारुड - कापडी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९०१.
( चाल-धर्म जागो० )
प्रालब्धीहुनि आलो । न ये त्या ठाया जातो ।
याल तरी संगे आहे । तुमचा मार्ग पाहातो ॥ध्रु०॥
आहांच आधार बळे । म्हणती हाचि धोपट ।
द्याहा डोळे झांकुनियां । तिकडे जाई धीट ॥१॥
तो मार्ग चुकला रे । पुढे आहे अव्हाट ।
चौर्‍यांशी चुकोनीयां । पडति कष्टावरी कष्ट ॥२॥
खेचरा वैराग्य वाट । तेथे नाही अव्हाट ।
ज्ञानबळे धांवता गा । संग सांडूनि एकट ॥३॥
निःसंगा भय नाही । जे संगाची वाट ।
ठाकिती जे पैलपार । त्यांचा जाला सेवट ॥४॥
म्हणो जरि तो राम जाला । देहि न साहे त्याला ।
जळाले जिणे त्याचे । असे जित ना मेला ॥५॥
रामदास म्हणे गेला । तोचि मागे राहिला ।
मागे पुढे वाव जाला । दासपणा मुकला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP