मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग

विविध विषय - भक्तिपर अभंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


५०७ .

तत्त्वमसि महावाक्याचा उपदेश । पाहिला निरास चौदेहांच ॥१॥

तयांमध्ये सार मानली साचार । भक्ति निरंतर राघवाची ॥२॥

कुंडलिनि गोर्‍हाट श्रीहट त्रिकूट । आणि मूळपीठ ब्रह्मरंध्र ॥३॥

मंत्र तंत्र मुद्रा आसन समाधि । दास म्हणे बुद्धि देखण्याची ॥४॥

५०८ .

ज्ञानेविण निर्नासिक । न ये संताचे सन्मुख ॥१॥

असोनि इंद्रिये सकळ । काय करावी निर्फळ ॥२॥

नाही कथा निरुपण । हे चि बधिरा श्रवण ॥३॥

नाही देवाचे वर्णन । ते गे तेंचि मुकेपण ॥४॥

नाही पाहिले देवासी । अंध म्हणावे तयासी ॥५॥

नाही उपकारा लाविले । ते गे ते चि हात लुले ॥६॥

केले नाही तीर्थाटण । व्यर्थ गेले करचरण ॥७॥

काया नाही झिजविली । प्रेतरुप चि उरली ॥८॥

नाही देवाचे चिंतन । मन हिंडे जैसे श्वान ॥९॥

नये परमार्थी बोलणे । जिव्हा नाही तेणे गुणे ॥१०॥

दास म्हणे भक्तिविण । अवघे देह कुलक्षण ॥११॥

५०९ .

भक्ति रामाची करावी । वंशावळी उद्धरावी ॥१॥

तनु मन आणि धन । सर्व लौकिक सांडून ॥२॥

पांच पंचकांचा भार । सर्वकाळ अत्यादर ॥३॥

रामीरामदास म्हणे । दृढ भक्तीचेनि गुणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP