मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| उपदेशपर विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - उपदेशपर श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ उपदेशपर Translation - भाषांतर ६६१.माझे माझे म्हणसी सेखी सांडुन जाशी । कां रे भुललासी सावध होई ॥१॥बहु दुःख पुढिलांचे दृष्टी देखतोसी ।काम रे भुललासी ० ॥२॥प्रपंचमैंदासी लुब्ध जाहलासी । कां रे भु० ॥३॥जठरी नवमास जतन केलासी । कां रे भु० ॥४॥नित्यगासी ऐकसी लुलु सांडिनासी । कां रे भु० ॥५॥रामदास सदा सांगतो तयासी । कां रे भुललासी सावध० ॥६॥६६२.काया हे काळाची घेऊनी जाणार । तुझेनि होणार काय बापा ॥१॥काय बापा ऐसे जाणोनि नेणसी । मी माझे म्हणसी वायांवीण ॥२॥वायांवीण शीण करिसी जन्मवरी । दंभ लोकाचारी नागवण ॥३॥नागवण आली परलोका जातां । लौकिक तत्त्वतां इही लोकी ॥४॥केली नाही चिंता नामी कानकोंडे । आतां कोण्या तोंडे जात आहे ॥५॥जात आहे सर्व सांडोनी करंटा । जन्मवरी ताठा धरोनियां ॥६॥धरोनीयां ताठा कासया मरावे । भजन करावे दास म्हणे ॥७॥६६३.संसारासी आले देवासी चुकले । प्राणी आले गेले वायांविण ॥१॥वायांवीण सीण केला जन्मवरी । मायामोहोपुरी वाहोनियां ॥२॥वाहोनियां जीवे भोगिली आपदा । आत्महित कदा केले नाही ॥३॥केले नाही आतां ऐसे न करावे । विवेके भरावे निरुपणी ॥४॥निरुपणी सारासार विचारणे । दास म्हणे येणे समाधान ॥५॥६६४.कोणाचे हे घर कोणाचा संसार । सांडुनी जोजार जाणे लागे ॥१॥जाणे लागे अंती एकले शेवट । व्यर्थ खटपट सांडुनिया ॥२॥जन्मवरी देहे संसारी गोविले । नाही कांही केले आत्महित ॥३॥आत्महित गेले संसाराचे ओढी । अंती कोण सोडी रामेविण ॥४॥रामेंविण कोणी सोडवीना अंती । वायांचि रडती जिवलगे ॥५॥जिवलगी राम दुरी दुरावला । विचार आपुला जाणवेना ॥६॥जाणवेना पूर्व सुकृतावांचोनी । पापियाचे मनी राम कैंचा ॥७॥राम कैंचा तया लौकिकाची चाड । पुरवीती कोड संसाराचे ॥८॥संसाराचे कोड तेंचि वाटे गोड । जया नाही वाड अनुताप ॥९॥अनुतापी जाले संसारी सुटले । राजे राज्य गेले सांडुनिया ॥१०॥सांडुनीयां गेले वैभव संपत्ति । पुढे यातायातीचेनि भेणे ॥११॥भेणे ते शरण रिघाले देवासी । नेले वैकुंठासी भक्तराज ॥१२॥भक्तराज भावे भेटले देवासी । रामीरामदासी धन्य वेळा ॥१३॥६६५.दैन्यवाणा जाला प्राणी । चंद्री लागली नयनी ॥१॥म्हणती उचला उचला । आतां भूमिभार जाला ॥२॥घोर लागला अमूप । प्राणी जाला प्रेतरुप ॥३॥दांतखीळ बैसली वदनी । ताठा पडिला करचरणी ॥४॥डोळे विक्राळ दिसती । झांका झांका मुले भीती ॥५॥रामीरामदास म्हणे । अवघी सुखाची सुणे ॥६॥६६६.अधिक बोलोंचि नेदिती । धरुनि जीभचि कापिती ॥१॥तेथे चालेना की ताठा । पोटासाठी देशवटा ॥२॥हातपाय ते कांपिती । कर्ण नासिक छेदिती ॥३॥शिर छेदुनियां सांडिती । कित्येकांस फांशी देती ॥४॥नानाप्रकारी यातना । अवघेंचि श्रुत आहे जनां ॥५॥दास म्हणे सेवाचोर । साहेबाचा हरमाखोर ॥६॥६६७.नवस पुरवी तो देव पूजिला । लोभालागी जाला कासावीस ॥१॥कासावीस जाला प्रपंची करितां । सर्वकाळ चिंता प्रपंचाची ॥२॥प्रपंचाचे चिंता करितांचि मेला । तो काय देवाला उपकार ॥३॥उपकार जाला सर्व ज्यांलागोनि । ते गेली मरोनि पाहतसे ॥४॥पहातसे पुढे आपणहि मेला । देवासि चुकला जन्मवरी ॥५॥६६८.ईश्वरेसी कानकोंडे । अंती जाईल कवण्या तोंडे ॥१॥लाजे हरिच्या रंगणी । जावयास लोटांगणी ॥२॥नेदी फुटका कवडा । चोरी घातला दरवडा ॥३॥धर्म न करी दुराचारी । नागविला राजद्वारी ॥४॥म्हणे रामीरामदास । प्राणी नागवला उदास ॥५॥६६९.देखिला संसार तरि पाहे सार । वायां येरझार पाडूं नको ॥१॥पाडूं नको दुःखसागरी आपणा । वेगी नारायणा ओळखावे ॥२॥ओळखावे वेगी आपाअपणासी । संसारी सुटसी दास म्हणे ॥३॥६७०.माता पिता जन स्वजन कांचन । प्रिय पुत्री मन गोंवूं नको ॥१॥गोंवूं नको मन राघवेवांचोनी । लोकलाज जनी लागलीसे ॥२॥लागलीसे परी तुंवां न धरावी । स्वहिते करावी रामभक्ति ॥३॥रामभक्तीविण होसील हिंपुटी । एकले शेवटी जाणे लागे ॥४॥जाणे लागे अंती बाळा सुलक्षणा । ध्याई रामराणा दास म्हणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP