लतिका - मुरडितसा नाकें आज पाहोनी ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
मुरडितसा नाकें आज पाहोनी या लतिकेला,
जाणाकीं निश्चय परि ही भूषवील उद्यानाला.
हे तीव्र विषाचे वारे, मधुपूरित ही करील;
‘शुष्क काष्ट’ म्हणतां तीच पसरेल दिगंतीं वेल.
शिशिराच्या शीतल भारी
लहरीवर येती लहरी,
ही झाली दीन विचारी,
इष्ट काळ हा न तियेला - भूषवील उद्यानाला.
==
येईल वसंत सुखाचा, ही पुलकित होइल बाला,
नंदनवना आणिल खालीं, भूमीला भेटविण्याला,
सुरकिन्नर येतिल तेव्हां. मग हिजला आळवण्याला -
तोंवरि हो ! घ्या हांसोनी,
भ्रुकुटींच्या विषमयबाणीं
कीं दुर्धर दुर्वचनांनीं -
घ्या ताडुनि या बालेला - भूषवील उद्यानाला.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP